AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनी साधला पाडव्याचा मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

आता बाजार समित्या बंद असताना कसले आलंय मुहूर्त असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच पण पाडव्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होती. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांनी साधला पाडव्याचा मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही...
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 5:19 PM
Share

लातूर : सोयाबीनच्या मुहूर्ताचा दर जरी कायम राहिलेला नसला तरी दराची फारशी चिंता न करता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधलेले आहे. आता बाजार समित्या बंद असताना कसले आलंय मुहूर्त असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच पण पाडव्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होती. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सोयाबीनच्या दरातील चढ-उतारामुळे बाजारात नेमकी आवक काय राहणार हे अद्यापही सांगता येत नाही. मध्यंतरी सोयाबीनचे दर घसरले तेव्हा केवळ 8 हजार पोत्यांची आवक होत होती. शुक्रवारी मात्र, 40 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांची दिवाळी ही गोड झाली आहे. बाजारपेठेत नवचैतन्य पाहवयास मिळाले.

सहा दिवसानंतर बाजार समिती सुरु

दिवाळीच्या अनुशंगाने रविवारपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. पाडव्याच्या दिवशी व्यवहार होतात हे शेतकऱ्यांना माहीत होते. त्यामुळेच शुक्रवारी पाडव्याच्या दिवशीही तब्बल 40 हजाप पोत्यांची आवक झाली होती. सलग सहा दिवस बाजार समिती बंद असल्याचाही हा परिणाम आहे. मात्र, सोयाबीनचे दर काहीही असोत शेतकरी विक्रीसाठी किती सजग झाला आहे हे शुक्रवारच्या आवक वरुन समोर आले आहे.

सोयाबीनला 5150 चा सरासरी दर

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या कडधान्य साठा मर्यादेच्या निर्णयाची मुदत ही संपलेली आहे. त्यामुळे कदाचित व्यापाऱ्यांनी साठवणूकीला सुरवात केलेली आहे. त्यामुळेच दर हे स्थिर आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. किमान दरात घसरण नाही हीच मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे बाजारातील दराचा अंदाज नसतानाही लातूरसह उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, सोलापूर, कर्नाटक येथून सोयाबीनची आवक झाली होती.

आता सोमवारी नियमित व्यवहार

शुक्रवारी पाडव्यानिमित्त येथील बाजार समिती ही सुरु होती. त्यामुळे सोयाबीनची विक्रमी आवक तर झालीच पण एकप्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, उद्या (शनिवारी) बाजार समितीमधील व्यवहार हे भाऊबीजमुळे बंद राहणार आहेत. सोमवारपासून नियमित व्यवहार होतील असे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीननंतर आता खरिपातील ‘हे’ पीक धोक्यात, काय आहे उपाययोजना ?

थंडी सुरु होताच लाळ्या खुरकताचा धोका वाढला, जनावरांची योग्य देखभाल हाच उत्तम पर्याय

ज्वारीच्या पेऱ्यात घट, यंदाच्या रब्बीत गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.