डिझेलच्या दरात घट, ऐन रब्बीत शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा ?

रब्बी हंगामाच्या तोंडावरच डिझेलचे दर कमी झाल्याने मशागत आणि इतर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या दरातही घट होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कारण डिझेलच्या दरवाढीमुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच नांगरणे, मोगडणे, रोटरने यामध्ये वाढ करण्यात आली होती आता दर कमी झाले असले तरी अद्यापही तेच दर लागू केले जात आहेत.

डिझेलच्या दरात घट, ऐन रब्बीत शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा ?
ट्रॅक्टरच्या सहायाने शेती मशागत
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 7:19 PM

लातूर : काळाच्या ओघात (Farming) शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होत आहे. आता (diesel prices) डिझेलच्या दराचा आणि शेतीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. पण पेरणीपासून शेतीमाल बाजारपेठेत दाखल करण्यापर्यंत डिझेलचा संबंध शेती व्यवसयाशी येत आहे. आता रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) तोंडावरच डिझेलचे दर कमी झाल्याने मशागत आणि इतर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या दरातही घट होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कारण डिझेलच्या दरवाढीमुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच नांगरणे, मोगडणे, रोटरने यामध्ये वाढ करण्यात आली होती आता दर कमी झाले असले तरी अद्यापही तेच दर लागू केले जात आहेत.

मात्र, काही दिवसांमध्ये मशागतीसह पेरणीचे दर कमी केले जातील असे ट्रॅक्टर चालकांचे मत आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून आज ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या वाढत आहे. यामुळे घरच्या शेतीची मशागतही होते शिवाय भाडेतत्वावर ट्रॅक्टर दिल्याने चार पैसेही मिळतात. यामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढत आहे. असे असले तरी वाढत्या डिझेलच्या किमतीचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या खिशावर होत आहे. मात्र, आता डिझेलचे दर 10 रुपयांनी घटलेले असले तरी ट्रॅक्टर चालकांनी वाढवलेले दर हे कायमच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट ही सुरुच आहे.

काळाच्या ओघाच ट्रॅक्टरची शेती

शेती मशागतीपासून ते शेत माल बाजारात दाखल करण्यासाठी वाहनांचा वापर केला जात आहे. मशागतीमध्ये नांगरण, मोगडणी, कोळपणी, रोटरणे, पेरणी एवढेच नाही तर उगवण झालेल्या पिकाची मशागतही ट्रॅक्टरच्या सहायाने केली जात आहे. सुरवातीच्या काळात मोजकेच शेतकरी या अवजारांचा वापर करुन शेती करीत असे मात्र, काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे यंत्राच्या वापराशिवाय शेती अशक्य अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या मागणीमुळेच मशागतीसह इतराचे दर वाढलेले आहेत.

काय आहेत शेती मशागतीचे दर

शेती मशागतीच्या दरावर वाढत्या डिझेल दराचाही परिणाम झालेला आहे. असे असले तरीही शेती कामे ही यंत्राच्या सहायानेच केली जात आहेत. ट्रॅक्टरने नांगरण्यासाठी 2 हजार रुपये मोगडण्यासाठी 1 हजार तर रोटरण्यासाठी 1 हजार 700 व पेरणीसाठी एकरी 1 हजार रुपये एवढे दर आहेत. असे असतानाही मजूर आणि काळाप्रमाणे होत असलेले बदल यामुळे ट्रक्टरला अधिकचे महत्व येत आहे. हे दर डिझेलच्या किमती वाढल्यानंतरचे आहेत. आता डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, ट्रॅक्टरने मशागत करण्याचे दर तेच कायम आहेत. त्यामुळे दर कमी करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

बैलजोडी कालबाह्य

बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे. प्रत्येक काम हे ट्रॅक्टरच्या सहायाने केले जात आहे. याकरिता अधिकचे पैसे द्यावे लागले तरी चालतील पण कामे वेळेवर होत आहेत यालाच शेतकरीही महत्व देत आहेत. त्यामुळेच यंदाच्या दिवाळी पाडव्यादिवशी राज्यात तब्बल 3 हजार ट्रॅक्टरची खरेदी झालेली आहे. शिवाय वाढत असलेल्या ऊस क्षेत्राचा परिणामही ट्रॅक्टर खरेदीवर झाला असल्याचे जाणकरांचे म्हणने आहे.

100 रुपयांनी होणार दर कमी

ट्रॅक्टरच्या सहायाने शेती मशागतीसह पेरणीसाठी सध्या आकरण्यात येणऱ्या दरात 100 रुपयांनी घट केली जाणार असल्याचे ट्रॅक्टर मालक अनिल तांबे यांनी सांगितलेले आहे. मात्र, शेतकऱ्यांना वाटत आहे सुधारीत दर लगेच लागू करावेत तर ट्रॅक्टर चालक हे रब्बी हंगाम संपल्यावर दर कमी करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.

संबंधित बातम्या :

बलीप्रतिपदेच्या दिवशी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती

शेतकऱ्यांनी साधले पाडव्याचे मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

सोयाबीननंतर आता खरिपातील ‘हे’ पीक धोक्यात, काय आहे उपाययोजना ?

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.