केंद्रसरकारच्या महत्वदायी सौर कृषीपंप ‘कुसुम’ योजनेची राज्यातील स्थिती, योजनेला प्रारंभ
राज्यात महाउर्जाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 14 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला 10 टक्के रक्कम ही अदा करावी लागणार आहे. जो लाभार्थी ही रक्कम पहिल्यांदा देणार त्यास प्रथम कृषी पंपाचे वाटप होणार आहे. दरवर्षी एक लाख कृषी पंप वाटपाचे उद्दीष्ट हे ठरवून देण्यात आले आहे.
मुंबई : दुर्गम भागातील शेती पिकांनाही मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सौर कृषीपंप कुसुम योजनेला सुरवात करण्यात आली होती. राज्यात महाउर्जाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 14 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला 10 टक्के रक्कम ही अदा करावी लागणार आहे. जो लाभार्थी ही रक्कम पहिल्यांदा देणार त्यास प्रथम कृषी पंपाचे वाटप होणार आहे. दरवर्षी एक लाख कृषी पंप वाटपाचे उद्दीष्ट हे ठरवून देण्यात आले आहे.
आजही शेतीच्या दुर्गम भागात पाणी पोहचलेले नाही. त्यामुळे शेती उत्पादनात घट होत आहे. ज्या भागात विद्युत पंप पोहचलेले नाहीत त्या ठिकाणची शेती सिंचनाखाली येण्याच्या दृष्टीने सरकार हे प्रयत्न करीत आहे. राज्यात 9 वितरकांकडून 3 हजार 800 कृषी पंपाची तयारी दर्शवण्यात आली आहे. महाउर्जाकडे आता 14 हजार अर्ज दाखल झाल्याने आता सौर कृषीपंपासाठी स्पर्धा होणार हे नक्की.
कुसुम सौर कृषी पंप पात्रतेसाठी हे आहेत निकष
1) ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत. 2) बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे. 3) ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील. 4) शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
कुसुम सोलार पंप योजनेचे वैशिष्ट्य ही आहेत वैशिष्ट्य
1) महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यास स्वखर्चाने इतर उपकरनेही त्याला जोडता येणार आहेत. 2) सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा हा लाभार्थी याचा राहणार आहे. 3) शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता
1) अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. 2) सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही. 3) अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो. 4) सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड 2) पासपोर्ट साईझ फोटो 3) रेशन कार्ड 4) नोंदणी प्रत 5) प्राधिकरण पत्र 6) जमीन प्रत 7) चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र 8) मोबाइल नंबर 9) बँक खाते विवरण
अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरवात
कुसुम सौर पंप योजना 2021 ला 14 सप्टेंबर पातून सुरवात झाली आहे. https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंकवर क्लिक करुन इच्छुकास अर्ज करता येणार आहे. (Solar agricultural pump ‘Kusum’ scheme launched, water to be available in remote areas)
इतर बातम्या :
‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात!’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया