स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

भारतात स्ट्रॉबेरीची लागवड फार पूर्वीपासून केली जात आहे. परंतु, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरवात केली आहे. strawberry Farming

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी
स्ट्रॉबेरी
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:21 PM

नवी दिल्ली: भारतात स्ट्रॉबेरीची लागवड फार पूर्वीपासून केली जात आहे. परंतु, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरवात केली आहे. स्ट्रॉबेरी शेतीतून जास्त उत्पन्न असल्याने त्याकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढत आहे. पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स आणि पारंपारिक पद्धतीनं खुल्या शेतामध्ये याची लागवड केली जात आहे. (strawberry Farming Farmers can earn up to 8 lakh rupees from one acre know details)

सामान्यपणे खुल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी योग्यप्रकारे नियोजनासह स्ट्रॉबेरी शेती केली तर एका एकरात 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. स्ट्रॉबेरी हे अतिशय नाजूक फळ आहे. लागवडीदरम्यान त्याच्या रोपांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

लागवडीसाठी योग्य काळ कोणता?

भारतात स्ट्रॉबेरीची लागवड सहसा सप्टेंबरमध्ये केली जाते. पावसाळ्यानंतरचा हा काळ स्ट्रॉबेरीसाठी योग्य मानला जातो. स्ट्रॉबेरीची रोपं कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये लावता येतात. मात्र, लाल माती असल्यास त्याचे उत्पादन जास्त मिळते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 15 ते 30 अंश तपमान योग्य असते. उच्च तापमानामुळे पिकावर वाईट परिणाम होतो.

स्ट्रॉबेरीच्या प्रमुख जाती

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार संपूर्ण जगात स्ट्रॉबेरीचे 600 प्रकार आहेत. भारतातील शेतकरी कामरोसा, चांदलर, ऑफ्रा, ब्लॅक मोर, स्वीड चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या वाणांचा वापर करतात. या जाती भारताच्या हवामानानुसार योग्य आहेत.

पूर्व मशागत

स्ट्रॉबेरी लागवडीपूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतामध्ये तीन ते चार वेळा रोटर फिरवला जातो. त्यानंतर शेणखत टाकले जाते. शेतकरी रासायनिक खतांचा देखील वापर करु शकतात. यानंतर शेतात बेड बनवले जातात. बेडची रुंदी एक ते दोन फूटांदरम्यान ठेवावी लागते. दोन्ही बेडमध्ये सारखं अंतर ठेवणं आवश्यक असतं. रोपांची लागवड करण्यासाठी प्लॅस्टिक पेपरद्वारे मल्चिंग केले जाते आणि त्यामध्ये निश्चित अंतरावर छिद्र बनविले जातात.

लागवडीनंतर काय करावं

स्ट्रॉबेरीच्या लागवडीनंतर ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा लक्षात ठेवून वेळोवेळी शेताला पाणी देणं गरजेचं असते. स्ट्रॉबेरीमधून चांगले उत्पादन मिळण्यासाठी खताचे प्रमाण खूप महत्वाचे आहे.शेतातील जमिनीचा पोत आणि स्ट्रॉबेरीच्या प्रकारावर अवलंबून खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषीमित्रांचा आणि कृषी अधिकाऱ्याचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. स्ट्रॉबेरी लागवडीच्या दीड महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया पुढे चार महिने चालू राहते. जर फळाचा रंग अर्ध्यापेक्षा लाल झाला तर ते फळ तोडलं पाहिजे.

संबंधित बातम्या:

पुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

VIDEO | शिवसेना आमदाराची हटके स्टाईल, थेट शेतात उतरुन यंत्राद्वारे भात लावणी

Strawberry Farming Farmers can earn up to 8 lakh rupees from one acre know details

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.