Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे. आतापर्यंत विविध आंदोलन, मोर्चे आणि परिषदा ह्या केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच पार पडलेल्या आहेत. सध्या निसर्गाच्या लहरीपणाबरोबर शेतकऱ्यांना सुल्तानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. त्याच अनुशंगाने बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
संदीप शिंदे : माढा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे. आतापर्यंत विविध आंदोलन, मोर्चे आणि परिषदा ह्या केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच पार पडलेल्या आहेत. सध्या निसर्गाच्या लहरीपणाबरोबर शेतकऱ्यांना सुल्तानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. त्याच अनुशंगाने (Baliraja Yatra) बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून (Farmer Issue) शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संघटनेचे सर्वेसर्वा (Raju Shetti) राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. बुधवारी माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे राजू शेट्टी यांची जाहीर सभा झाली असून शेतकऱ्यांच्या मूलभूत सोडवण्याचे आवाहन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास या सरकारला वेळ नाही तर भोंग्यावरुन केवळ राजकारण होत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
काय आहेत स्वाभिमानी संघटनेच्या मागण्या?
रबी हंगामाच्या सुरवातीपासून शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी ही या संघटनेने केलेली आहे. शिवाय याकरिता आंदोलन, आमरण उपोषण करुनही सरकारने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या हुंकार यात्रेत कृषीपंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा, एक रकमी एफआरपी अदा करावी, शेतीसाठी किमान 10 तास विद्युत पुरवठा आणि तो ही खंडित न होता, रासायनिक खतांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड होत आहे. विमा कंपन्यावर नियंत्रण ठेवावे अशा मागण्या या हुंकार यात्रेतून मांडल्या जात आहेत.
ऊस हेच शाश्वत पीक, पवारांना केवळ कारखानदारांचे हित
उसाचे पीक हे आळशी शेतकरी घेत असल्याचे विधान खा. शरद पवार यांनी केले होते. याचा समाचार राजू शेट्टी घेत असून उसासारखे शाश्वत पीक नाही. भले उसाला दर नसला तरी उत्पन्नाची हमी आहे. ज्यांनी सातत्याने कारखानदारांचे हीत जोपासले त्यांना काय माहित शेतकऱ्यांच्या व्यथा असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्य़ा विधानाचा समाचार घेतला. शिवाय उसामुळे शेतकरी हे समृध्द झाले आहेत. उस हे सर्वात मोठे नगदी पीक असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याच पिकाचा आधार मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवारांच्या बालेकिल्ल्यात बळीराजा हुंकार यात्रा…
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच राजू शेट्टी यांची सभा होत. बुधवारी इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर शेट्टींची सभा होणार आहे. यामध्ये राज्यात विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, अतिरिक्त ऊस प्रश्न याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांवर ते काय बोलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
Chickpea Crop : ‘नाफेड’ चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी
Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल