Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

आतापर्यंत अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील फळपिकांचे नुकसान झाले होते. पण आता अवकाळीची अवकृपा सर्व राज्यभर सुरु झाली आहे. अनियमित पावसापासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पीके बचावली होती पण आता पीके अंतिम टप्प्यात असतानाच जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर बार्शी परिसर हा मराठावड्याला लागूनच असलेला भाग आहे.

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 3:26 PM

सोलापूर : आतापर्यंत (Unseasonable Rain) अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील फळपिकांचे नुकसान झाले होते. पण आता अवकाळीची अवकृपा सर्व राज्यभर सुरु झाली आहे. अनियमित पावसापासून मराठवाडा आणि (Western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रातील पीके बचावली होती पण आता पीके अंतिम टप्प्यात असतानाच जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर बार्शी परिसर हा मराठावड्याला लागूनच असलेला भाग आहे. या भागात (Rabi Season) रब्बी हंगामासह द्राक्ष या फळपिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, अवकाळीमुळे काढणीला आलेल्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या तर गहू, ज्वारी तसेच आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकाच वेळी दुहेरी फटका या भागातील शेतकऱ्यांना बसलेला आहे.

बार्शी तालुक्यावर निसर्गाची अवकृपा

हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वरुणराजाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामध्ये यामध्ये रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबागळही मोठ्या प्रमाणात झाली असून जे चित्र नाशिक आणि कोकणात तीच अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके अंतिम टप्प्यात होती. मात्र, एका रात्रीतून झालेल्या पावसामुळे सर्वकाही मातीमोल अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील आगळगाव, उंबरगे, काटेगाव,भानसळे, खडकोनी, मांडेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दीड एकर द्राक्ष भुईसापाट

उत्तर बार्शी परिसरात प्रामुख्याने ज्वारी हे मुख्य पिक आहे. सध्या ज्वारी काढणीला सुरवात असून अचानक आलेल्या पावसाने ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मांडेगाव येथील शेतकरी प्रभाकर मिरगणे यांची गट नं 126 /1 मधील दीड एकर द्राक्षबाग पूर्णपणे भुईसपाट झाली. यामध्ये 15 ते 20 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी प्रभाकर मिरगणे यांनी दिली. एकूणच झालेल्या या अस्मानी आक्रमणामुळे बार्शी तालुक्यातील शेतकरी चांगलाच हतबल झाल्याचे पहायला मिळाले.

रब्बी पिकांसह फळबागा अंतिम टप्प्यात

अवकाळी हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. आतापर्यंत या पावसातून केवळ नुकसानच पदरी पडलेले आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी या पिकाची काढणी कामे जोमात सुरु आहेत. पिकांची काढणी करुन वावरातच पसरण आहे. अशा परस्थितीमध्ये झालेल्या पावसामुळे ज्वारी ही काळवंडणार असून त्याच्या दर्जावर परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे द्राक्षाचे उत्पादन यंदा घटले असताना आता बांगाचेही नुकसान शेतकऱ्यांना सहन न होणारे आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : ऊसतोड मजुरांसाठी कायपण! गाळप पूर्ण होण्यासाठी कारखान्याची अनोखी शक्कल

Sugarcane Sludge: साखर उत्पादनाबाबतचे सर्व अंदाज fail, अतिरिक्त उसतोडणीसाठी आता परराज्यातून तोडणी यंत्र!

Nanded: उन्हाच्या झळा त्यात बुरशीचा प्रादुर्भाव, 20 वर्षापासून मोसंबी फळबाग जोपसणाऱ्या शेतकऱ्याची अनोखी कहाणी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.