केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीवर शिक्कामोर्तब, उसाचा भाव 290 रुपये क्विंटल, 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा
केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 2022-23 च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 2022-23 च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले. यानुसार गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपयांनी, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 आणि मोहरीच्या 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. एका क्विंटलला 290 रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे 5 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय 5 लाख कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होईल.
#Cabinet under PM Sh @NarendraModi approves highest ever Fair and Remunerative Price of 290 Rs/qtl approved for Sugarcane Farmers. This will benefit 5 crore sugarcane farmers as well as 5 lakh workers employed in sugar mills and related ancillary activities.#KisanKiSarkar pic.twitter.com/xy3Bv78wvj
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 8, 2021
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमएसपी जाहीर
केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याची घोषणा अशा वेळी केलीय जेव्हा देशातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनानं जोर पकडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांना किमान आधारभूत किमतीवर हमी हवी आहे. तर, सरकारने स्पष्ट केले आहे की एमएसपी रद्द होणार नाही आणि आज पुन्हा एकदा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.
Union Cabinet approves MSP for rabi crops for marketing season 2022-23: Govt of India
— ANI (@ANI) September 8, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी गव्हाच्या आधारभूत किमतीत 40 रुपयांनी, बार्लीच्या किमंत 35 रुपयांनी, हरभऱ्याने 130 रुपयांनी, मसूर आणि मोहरीने 400 रुपयांनी आणि सूर्यफूलच्या किमतीत 114 रुपयांनी वाढ केली आहे.
रब्बी पिकांसाठी विपणन हंगामासाठी MSP (2022-23)
गहू: 2015 रुपये क्विंटल हरभरा : 3004 रुपये प्रति क्विंटल बार्ली :1635 रुपये क्विंटल मसूर डाळ : 5500 रुपये क्विंटल सूर्यफूल: 5441 रुपये क्विंटल मोहरी : 5050 रुपये क्विंटल
गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणत्या पिकाच्या MSP मध्ये किती वाढ झाली?
गव्हाचा एमएसपी 40 रुपयांनी वाढला, हरभरा एमएसपी 130 रुपयांनी वाढला , बार्लीचा एमएसपी 35 रुपयांनी वाढला , मसूर डाळचा एमएसपी 400 रुपयांनी वाढला , सूर्यफुलाचा एमएसपी 114 रुपयांनी वाढला, मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढला
इतर बातम्या:
Union cabinet increases msp for rabi crops for marketing season 2022 23 wheat rate increase 40 rupees per quintal decision taken in Modi Cabinet