VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो
जळगावमधील कजगावच्या (तालुका - भडगाव) जवळच असलेल्या तांदुळवाडी शिवारात एका शेतकऱ्याचं तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं.
जळगाव : बेभरवशी निसर्ग, बाजारातील लहरीपणा आणि त्यात कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. जळगावमधील कजगावच्या (तालुका – भडगाव) जवळच असलेल्या तांदुळवाडी शिवारात एका शेतकऱ्यालाही अशाच संकटांच्या मालिकेला तोंड द्यावं लागतंय. या शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं. त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेल्या आपल्या पिकाचं नुकसान पाहून शेतकरी महिलेने टाहो फोडला. या घटनेने कजगाव परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो@dadajibhuse #Farmer #Jalgaon pic.twitter.com/FiiqGLuCgo
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 5, 2021
आधीच ग्रामीण भागातील शेतकरी कोरोना साथीरोगाच्या प्रादुर्भावामधून जात आहेत, त्यात शेतकऱ्यांवर येणारे विविध संकटाना तोंड देताना शेतकरी हवालदिल होत आहे. दिवसरात्र मेहनत करून देखील त्याला पुरेसा मोबदला मिळत नाही. त्यातच मळगाव येथील रहिवासी मीराबाई उत्तम गायकवाड व सचिन गायकवाड यांना मोठं नुकसान झालं. ते आईच्या मालकीचं तांदुळवाडी शिवारातील शेत करतात. तेथील साधारणतः दीड ते दोन एकर जमिनीतील कपाशी पीक उपटून अज्ञान माथेफिरुने नुकसान केलं.
शेतातील नुकसान पाहून शेतकरी महिलेचा आक्रोश
हे शेतकरी आदिवासी समाजातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घटनास्थळी झालेले नुकसान पाहून मीराबाई गायकवाड यांचा आक्रोश पाहायला मिळाला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे हे ओक्साबोक्सी रडणे पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी सरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील रेश्मा मरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष जयंत पाटील, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, स्वप्नील पाटील, प्रताप परदेशी, रतन बैरागी यांच्यासह मळगाव तांदुळवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नुकसानग्रस्त शेतकरी सचिन गायकवाड स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत.
माथेफिरूंना त्वरीत अटक करण्याची मागणी
आदिवासी भिल्ल समाजातील मीराबाई गायकवाड यांना न्याय मिळून त्या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला त्वरीत अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावी. दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे एवढे मोठे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याचं नुकसान?
शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून पिकांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे जतन करून वाढीस नेत असतो. एवढी मेहनत करुनही माथेफिरूंकडून होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार राजकीय द्वेषापोटी घडली असल्याचीही चर्चा दिवसभर गावात रंगली होती. त्यामुळे घटनेचा सखोल तपास करून त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी जोरदार होत आहे.
हेही वाचा :
सिंधुदुर्गात गवारेड्यांचा धुमाकुळ, हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान
औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू
आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही : बाळासाहेब थोरात
व्हिडीओ पाहा :
Unknown person destroy 2 acre cotton crop of Jalgaon farmer