Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद
बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन डोस हे बंधनकारक करण्यात आले होते तर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना डोसची व्यवस्थाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी कल्याण - डोंबवली मनपा हद्दीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कल्याण : वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता बाजार समित्यांमध्ये नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. त्यानुसार बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन डोस हे बंधनकारक करण्यात आले होते तर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना डोसची व्यवस्थाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी कल्याण – डोंबवली मनपा हद्दीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
नियम डावल्यास दंडात्मक कारवाई
बाजार समितीमधील किरकोळ बाजार हे बंद करण्यात आले आहेत शिवाय, कल्याण शहरातील आठवडी बाजारही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतानाही आठवडी बाजार भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी केवळ व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये घाऊक बाजारास परवानगी ती देखील नियम अटींसह देण्यात आली आहे. कामगार, हमाल यांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक राहणार आहे.
‘एपीएमसी’ ची जबाबदारी देखील महत्वाचीच
वाढत्या कोरोना बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळवणे ही सर्वाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे बाजार समितीनेही घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने व्यापारी- वाहने ही बाजार समितीमध्ये येत असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणे आणि त्यांना योग्य त्या सुचना देणे हे काम बाजार समिती प्रशासनाचे आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये शेतीमाल वाहतूक करणाऱ्या केवळ 50 वाहनांनाच बाजार समितीमध्ये प्रवेश दिला होता. योग्य खबरदारी घेतली तरच रुग्णसंख्या ही कमी होणार असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
इतर बाजार समित्यांमध्येही नियमावली जारी
सबंध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजार समिती मधील व्यवहार सुरु राहणे हे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढीचे कारण बाजार समित्या ठरत असतील त्यावरही निर्बंध आणावे लागतील अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाची सोय, गर्दीवर नियंत्रण, दोन डोस घेतले आहेत का? याची पडताळणी कृऊबा प्रशासनाला करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच