Banana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

प्रत्येक फळाला एक विशिष्ट्य सिझन हा ठरलेला आहेच. पण केळी हे असे फळ आहे जे बाराही महिने बाजारपेठेत उपलब्ध असते. त्या तुलनेत आंबा, द्राक्षे, टरबूज, सीताफळ यांना एक विशिष्ट्य कालावधी आहे. त्यामुळे केळीची लागवड ही केव्हाही करता येते. यासाठी आवश्यक आहे ते बाजारपेठेचा अभ्यास करणे.

Banana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 7:10 AM

मुंबई : प्रत्येक फळाला एक विशिष्ट्य सिझन हा ठरलेला आहेच. पण केळी हे असे (Fruit) फळ आहे जे बाराही महिने बाजारपेठेत उपलब्ध असते. त्या तुलनेत आंबा, द्राक्षे, टरबूज, सीताफळ यांना एक विशिष्ट्य कालावधी आहे. त्यामुळे (Banana Cultivation) केळीची लागवड ही केव्हाही करता येते. यासाठी आवश्यक आहे ते बाजारपेठेचा अभ्यास करणे. यासाठी टिश्युकल्चर हा प्रकार निवडावा की, जेणे करून खात्रीशीर कळ धारणा व झटपट उत्पन्न मिळते. भारत हा केळी लागवडीत जगात दोन नंबरचा देश आहे व त्यात (Maharashtra) महाराष्ट्र हे केळी पिकासाठी सर्वात आघाडीचे राज्य आहे. प्रत्येकांनी ठराविक एकाच सिझनला लागवड केल्यास सर्वांचा माल एकाच वेळी बाजारात विक्रीस दाखल होणार आहे. त्यामुळे योग्य दर मिळणार नाही. बाजारपेठेचे गणित कोलमडल्यावर शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे केळी ही पावसाळी, उन्हाळी आणि हिवाळा हंगामातही लागवड केली तरी फायद्याचीच राहणार आहे.

बिगर मोसमी केळी लागवडीचे फायदे :

पावसाळी केळी लागवड : ही लागवड साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये करता येते. या दरम्यानच्या काळात नुकताच उन्हाळा संपून पावसास सुरवात झालेली असते व वातावरणही दमट असते हवेत आर्द्रतेचे प्रमाण असते. त्यामुळे रोपांची वाढ झापाटयाने होते. या कालावधीत जोपासलेली केळी निर्यातीस अतिशय उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात झाडातील पानांचा रंग देखील बदलतो तसेच आंबा, द्राक्ष, टरबुज यांचा सिझन संपल्यामुळे बाजारात केळी ला चांगला भाव असतो.

हिवाळ्यात केळीची लागवड : पावसाळा नंतरच्या या काळात शेतजमिनी या केळी लागवडीसाठी योग्य झालेल्या असतात. हलक्या प्रकारची

मशागत करुन केळीची लागवड केली की, वाढ जोमात होते कीड-रोगराईचाही प्रादुर्भाव वाढत नाही. ही लागवड साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या चार महिन्यात केली जाते. पावसाळा संपल्याने जमिनीतील ओलावा कमी झालेला असतो व जमिन नैसर्गिक वापसा स्थितीत असते. लागवडीच्या वेळेस रोपे जमिनीत लवकर सेट होतात तसेच थंडीमुळे झाडावर रोगांचा प्रार्दुभाव लागवड होत नाही.

उन्हाळी केळी लागवड : उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर या हंगामात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे योग्य मशागत आणि लागवडीसाठी

पुरेसा वेळही शेतकऱ्यांच्या हाती असतो. साधारण मार्च, एपिल , मे व जून हे चार महिन्यात लागवड करता येते. या महिन्यात तापमान हळूहळू वाढत असते. तसेच थोड्याफार प्रमाणात दमट हवामान असते जे रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते व जमिनी लवकर वाफस्यामध्ये येतात. उन्हाळी लागवडीची बाग ही उन्हाळयातच काढावयास येते व दुसरे कोणतेही फळ बाजारात विक्रीस नसल्या कारणाने बाजारभाव देखील चांगला मिळतो. तीन्ही हंगामात केळीची लागवड करता येत असली तरी बाजारपेठेत काय दर आहेत य़ावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

(सदरील माहिती जामखेड येथील विकास कुलकर्णी विक्री विभाग यांनी लिहलेल्या गोडवा या पुस्तकातील लेखाच्या आधारे घेतलेली आहे. त्यामुळे केळी लागवड करताना कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या :

किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत

नियम साखर कारखान्यांसाठी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच, ‘त्या’ निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा, न्यायालयाचे आदेश काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.