ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी, मग पुढची चाकं लहान का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण
ट्रॅक्टरचे पुढील टायर लहान आणि मागील टायर मोठे का असतात याबाब जाणून घेणं आवश्यक आहे. tractor Back tyre big front tyres
नवी दिल्ली: गावात आणि शहरात आपण ट्रॅक्टर पाहत असतो. ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीमधील काम सोपी झाली आहेत. आपण लहानपणापासून पाहतो ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी आणि पुढची चाकं लहान असतात. मात्र, हे असं का असतं? ते जाणून घेणं गरजेचं आहे. ट्रॅक्टरच्या चाकांविषयी आपल्याला एकतर माहिती नसतं किंवा थोडीफार माहिती असते. या बातमीच्या माध्यमातून ट्रॅक्टरची दोन चाकं लहान आणि दोन चाकं मोठी का असतात हे जाणून घेणार आहोत. (Why tractor Back tyres are big and front tyres small know all details here)
ट्रॅक्टरचं इंजिन कारपेक्षा जास्त पॉवरफूल असतं का?
सगळ्या चारचाकी गाड्यांच्या मागची आणि पुढची चाकं सारखी असतात, मग ट्रॅक्टरची का नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण उत्तर देतील की ट्रॅक्टरचं इंजिन हे जास्त पॉवरफूल असतं, म्हणून मागे मोठी चाकं असतात..मात्र, तुम्हाला हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की, ट्रॅक्टरचं इंजिन हे एका कारइतकंच असतं, इंजिनच्या पॉवरचा आणि त्याच्या चाकाचा काहीही संबंध नाही. हो, ट्रॅक्टरचं इंजिन जास्त टॉर्क म्हणजेच ट्रॅक्शन तयार करतं. याच ट्रॅक्शनवरुन त्याला ट्रॅक्टर हा शब्द मिळाला आहे. याचा अर्थ होतो ओढणं, कुठलीही गोष्ट ओढायला जी ताकद लागते, त्याला ट्रॅक्शन वा टॉर्क म्हणतात. ट्रॅक्टरचा टॉर्क हा कुठल्याही कारहून दीडपट अधिक असतो. यामुळे ट्रॅक्टरला वेग मिळत नसला, तरी त्यातून त्याला ताकद मिळते.
ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का?
तर याचं उत्तर ट्रॅक्टरला कराव्या लागणाऱ्या कामात दडलंय, ट्रॅक्टर डांबरी रस्त्यांवर चालण्यासाठी बनवण्यात आलेला नाही, तर चिखल-मातीत काम करण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे, चिखलात चाकं रुतू नये आणि सहजगतीने कामं व्हावी यासाठी ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी असतात. कुठलीही गोष्ट ओठताना, ही मागची चाकं ट्रॅक्टरला स्थिरतेसोबत जमीनवर पकड मिळवून देतात, त्यामुळे ट्रॅक्टरचं इंजिनजरी कमी क्षमतेचं असलं, तरी त्याची ताकद ही मात्र जास्त असते..
मागची चाकं मोठी, मग पुढची चाकं लहान का?
असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो, जर शेतीतच अवजड काम करायचं आहे, तर पुढची चाकंही मोठी हवी असं अनेकजण म्हणून शकतात. मात्र, पुढच्या चाकांचं काम ओढण्याचं नाही, तर दिशा देण्याचं आहे. पुढची चाकं लहान असल्याने ट्रॅक्टर वळवणं सोपं होतं, शिवाय, मागच्या चाकांचं वजन प्रचंड असतं, त्यात ट्रॅक्टरचं इंजिन हे पुढं असतं, त्यामुळे संतुलन ठेवण्यासाठी पुढं छोटी चाकं लावली जातात..
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा मुक्तसंचार, ताडोबा मार्गावर प्रवासी आणि वाघ आमने-सामनेhttps://t.co/fVPDfaXLAI#Chandrapur | #Tiger | #Tourism | #Tadoba
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या:
(Why tractor Back tyres are big and front tyres small know all details here)