Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 3 नवे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, 3 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हुतात्मा चौक, काळाघोडा चौक आणि राम्पार्ट पदपथ या 3 ठिकाणी नियोजित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबईत 3 नवे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, 3 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा
electric vehicle charging (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 4:43 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हुतात्मा चौक, काळाघोडा चौक आणि राम्पार्ट पदपथ या 3 ठिकाणी नियोजित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हुतात्मा चौकात छोटेखानी समारंभात करण्यात आले. (3 new electric vehicle charging stations in Mumbai, free charging facility for 3 months)

दरम्यान, या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, उप आयुक्त (परिमंडळ 1)विजय बालमवार, ए विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि इतर मान्यवर उपास्थित होते. ए विभागाच्या हद्दीतील मुंबई उच्च न्यायालय, हॉर्निमन सर्कल यासह इतरही महत्त्वाच्या परिसरांमध्ये स्थित सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी अशाप्रकारची चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची सूचना मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विजेवर भारीत होऊन (इलेक्ट्रिक चार्जिंग) धावणाऱ्या वाहनांच्या धोरणाला पाठबळ देण्यात आले आहे. या धोरण अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीला महानगरपालिकेच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे. जेणेकरुन, अधिकाधिक नागरिक विद्युत वाहने वापरात आणू शकतील.

3 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा

महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या वतीने एकूण 3 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामध्ये हुतात्मा चौक सशुल्क वाहनतळ, काळाघोडा चौकातील सशुल्क वाहनतळ आणि राम्पार्ट मार्ग पदपथ सशुल्क वाहनतळ या 3 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या तीनही ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यांसाठी विनामूल्य इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल.

या तीनही ठिकाणी प्रत्येकी 3 चार्जिंग पॉईट असतील. तसेच प्रत्येक चार्जिंग पॉईट 7.4 किलोव्हॅट एसी चार्जिंग क्षमतेचा असेल. त्यासाठी सिंगल फेज विद्युतपुरवठा केला जाईल. सिंगल फेज विद्युतपुरवठा असल्या कारणाने छोट्या जागेत आणि लहान आकारात हे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन बांधणे शक्य होणार आहे. तसेच वाहने चार्जिंग करताना सुरक्षितरित्या चार्ज होऊ शकतील. त्यासोबत या चार्जिंग स्टेशन्सची देखभाल करणे देखील तुलनेने सोपे असते.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(3 new electric vehicle charging stations in Mumbai, free charging facility for 3 months)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.