Maruti Car : पेट्रोल-डिझेल, सीएनजी नाही तर…‘या’वर चालेल मारुतीची नवीन कार
पेट्रोल-डिझेलन अन् सीएनजीनंतर मारुती आता इथेनॉलवर चालनारी कार बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे ही कार चालवणे पेट्रोल कारपेक्षा अधिक स्वस्त असणार आहे. इथेनॉलवर चालणारी कार सर्वसामान्यांना कशी परवडेल, याबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.
पेट्रोल-डिझेल (petrol-diesel)आणि सीएनजीनंतर (CNG) आता मारुती एक फ्यूअल हायब्रिड कार बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. इथेनॉलवर चालणारी ई20 वाहनांना पुढील वर्षी बाजारात आणण्याची तयारी मारुतीकडून सुरु झाली आहे. ई20 वाहन, ही वास्तविक पेट्रोल आणि इथेनॉल असे दोघांवर चालणारी वाहने असतात. सोबत कंपनीचा हाही दावा आहे, की भविष्यात सर्वच कारमध्ये असे इंजीन उपलब्ध राहणार आहेत. या सर्व वाहनांची ट्युनिंग ही इथेनॉल फ्यूअलनुसार सेट करण्यात येणार आहे. इथेनॉलवर (ethanol) आधारीत कारच्या किमतींबाबत बोलायचे झाल्यास ई20 वाहनांच्या किमती इतर वाहनांपेक्षा काहीशा जास्त असण्याची शक्यता आहे.
सध्या मारुती कंपनी पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि फ्लेक्स फ्यूअल पर्यायासोबत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांवर काम करीत आहे. जाणून घेउया, मारुतीच्या या विविध इथेनॉलवर चालणार्या वाहनांची माहिती,‘कारदेखो’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, कंपनीची पुढील रणनीती ई20 वर चालणार्या वाहनांना अनुसरुन आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 2023 एप्रिलपर्यंत ई20 वाहने रस्त्यांवर दिसू लागतील. ई20 वाहने म्हणजे अशी वाहने जी 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलपासून बनलेली असतील. पेट्रोल आणि सीएनजीच्या व्यतिरिक्त कार आता तिसर्या पर्यायासोबत दिसून येणार आहे. एक फ्लेक्स फ्यूअल इंजीन हे स्टँडअलोन किंवा मिक्स फ्यूलवरच काम करत असते. सध्या कारमधील इंजीन सेटिंग्स् सोबत 5 ते 10 टक्के इथेनॉलचे मिश्रण वापरण्यात येत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ई20 इंजीनवर चालणारी वाहनांची किंमत ही इतर वाहनांच्या तुलनेत काहीशी जास्त असू शकते.
कशापासून बनते इथेनॉल इंधन
इथेनॉलच्या वापराने इंधनाच्या फ्यूअल इकॉनॉमीमध्ये काहीशी पडझड होण्याची शक्यता असून सरकार ब्लेंडेड फ्यूअलवर कमी कर आकारण्याचे नियोजन करीत आहे. इथेनॉल स्थानिक कच्च्या मालापासून तयार होत असते. यात कुठल्याही आयातीची गुंतागुंत नसते. त्यामुळे या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षा कमी असते. 2025 पर्यंत कारमध्ये ई20 ब्लेंड फ्यूअल इंजीनचा वापर करण्यात यावा, असे सरकारचे नियोजन आहे. आतापर्यंत सर्व कार कंपन्यांमध्ये केवळ मारुतीच ई20 फ्यूअलवर काम करीत असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या :