Electric Car : एमजी मोटर्सकडून अजून एक नवी इलेक्ट्रिक कार… केवळ चार सेकंदात 100 किमीचा स्पीड
या कारच्या परफॉर्मेंसबाबत कंपनीचा दावा आहे, की ही कार केवळ चार सेकंदामध्ये 0-100 किलोमीटरपर्यंतचा स्पीड धारण करण्यास सक्षम आहे. एमजीची ही लेटेस्ट इलेक्ट्रिक मुलान कार अनेक आकर्षक फीचर्ससह दाखल होणार आहे.
मुंबई : एमजी मोटर्सकडून (MG Motors) आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार (Electric car) मुलान परफॉर्मेंस व्हीकलवरुन परदा उठवण्यात आला आहे. मोरिस गॅराज्सतर्फे तयार करण्यात आलेली ही 5 डोर इलेक्ट्रिक कार कंपनीच्या नेबुला प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे. या कारच्या परफॉर्मेंसबाबत (performance) कंपनीचा दावा आहे, की ही कार केवळ चार सेकंदामध्ये 0-100 किलोमीटरपर्यंतचा स्पीड धारण करण्यास सक्षम आहे. एमजीची ही लेटेस्ट इलेक्ट्रिक मुलान कार अनेक आकर्षक फीचर्ससह दाखल होणार आहे. सोबत यात हाई डेनसिटी बॅटरी पॅक देण्यात आला असून यामुळे कंपनीला पातळ आकारातील बॅटरी तयार करण्याची शक्यता आहे. यामुळे कारमध्ये जास्त स्पेस मिळण्याची संधी वर्तविण्यात येत आहे.
सेफ्टीकडे विशेष लक्ष
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीकडून या पार्श्वभूमीवर ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेउन सेफ्टीसाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. कारच्या 5 डोर क्रोसओव्हर कारमध्ये आकर्षक लूक दिसून येणार आहे. सोबतच यात एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स देखील उपलब्ध होणार आहे. यात फॉरवर्ड डिपिंग बोनेट देण्यात येणार आहे. सोबतच यात एक मोठा एअर इनलेट लावण्यात येणार आहे.
एमजी मुलानचा आकर्षक लूक
एमजीच्या या नवीन कारचा लूक एक कुपे स्टाइलच्या कारसारखा असू शकतो. यात एक लार्ज पेनारोमिक सनरुफ मिळेल. तसेच डबल बब्ल रुफ स्पाइलर बघायला मिळणार आहे. यात बमरँड शेपमध्ये एलईडी टेल लँप आणि थिक लाइट बार उपलब्ध होणार आहे. यात बॉडी कलरचे डोर हँडल्स असणार आहेत. एमजीचा फोकस ग्लोबल रीचवर दिसून येत आहे. कारण या वर्षीच्या शेवटीपर्यंत ती देशातील अनेक देशांपर्यंत आपले प्रोडक्ट पोहचवणार आहे. सोबत कंपनी आपल्या उत्पादन युनिट्सलाही वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने नुकतेच आपल्या नवीन मुलान कारचे काही इमेज प्रसिध्दही केले आहेत.
3 लेव्हलच्या टेक्नोलॉजीचा समावेश
एमजी मुलान परफार्मेंस इलेक्ट्रिक व्हीकल 3 लेव्हलच्या ऑटोनोमस टेक्नोलॉजीसह बाजारात दाखल होणार आहे. यात 5जी टेक्नीकलाही सहभागी केले जाणार आहे. यात कंपनीतर्फे एक स्मार्ट कोकपिट तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, भारताबाबत बोलायचे झाल्यास, कंपनी एक वेगळ्या 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान, येणार्या कारला तयार करण्याच्या तयारीमध्ये आहे. ही या इलेक्ट्रिक सेगमेंटची कार असणार आहे. या कारची स्पर्धा टाटा मोटर्सच्या कार्सशी होणार आहे. सध्याच्या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कार्समध्ये टाटाचे वर्चस्व आहे.