Nissan Magnite च्या ग्राहकांना धक्का, कंपनीकडून ग्लोबल प्रोडक्शनमध्ये 30 टक्के कपात, जाणून घ्या कारण
जागतिक चिप संकटामुळे बहुतेक कार निर्मात्यांची उत्पादन क्षमता कमी होत आहे. याचदरम्यान, निसान मोटरने नोव्हेंबरपर्यंत वाहनांच्या उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : जागतिक चिप संकटामुळे बहुतेक कार निर्मात्यांची उत्पादन क्षमता कमी होत आहे. याचदरम्यान, निसान मोटरने नोव्हेंबरपर्यंत वाहनांच्या उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. जपानी कार उत्पादक कंपनीने म्हटले आहे की, उत्पादनात कपात केल्याने नोव्हेंबरपर्यंत जगभरात तयार होणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे एक तृतीयांश कमी होऊ शकते. (Are you Planning to buy Nissan Magnite suv, waiting period may get longer)
निसानने म्हटले आहे की, कोविड -19 साथीच्या आजारामुळे सेमीकंडक्टरच्या सततच्या कमतरतेमुळे जागतिक उत्पादनात 30% कपात करण्याची योजना आहे. Nikkei च्या मते, कार निर्माता कंपनी या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत जगभरात केवळ 5,83,000 कार तयार करेल.
निसान मॅग्नाइट (Nissan Magnite SUV) या कारला देशात मोठी मागणी आहे, मात्र दुसऱ्या बाजूला सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे सध्या या कारसाठीचा वेटिंग पीरियड 8 महिन्यांचा आहे. हा वेटिंग पीरियड आगामी काळात आणखी वाढू शकतो.
कशी आहे मॅग्नाईट?
कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.
निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती
- Magnite XE – 5.59 लाख रुपये
- Magnite XL – 6.32 लाख रुपये
- Magnite XV – 6.99 लाख रुपये
- Magnite XV Premium – 7.68 लाख रुपये
- Magnite Turbo XL – 7.49 लाख रुपये
- Magnite Turbo XV – 8.09 लाख रुपये
- Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये
- Magnite Turbo XL CVT – 8.39 लाख रुपये
- Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये
- Magnite Turbo XV Premium CVT – 9.74 लाख रुपये
दोन इंजिनांचा पर्याय
Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.
या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.
Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स
- Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.
- LED DRL, LED इंडिकेटर
- 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स
- व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.
इतर बातम्या
Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स
अवघ्या 20 मिनिटात MG Astor च्या 5000 युनिट्सची विक्री, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?
दिवाळीला गाडी घेण्याचा विचार करताय?, 5 गाड्यांवर ह्युंदाईचा 50 हजारांपर्यंत बंपर डिस्काऊंट
(Are you Planning to buy Nissan Magnite suv, waiting period may get longer)