महिन्याला केवळ 1300 भरा आणि जबरदस्त बाईक घरी न्या, मायलेज तब्बल 91 किमी!
सध्या बाजारात बजाज सीटी 100 हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण बजाज सीटी 100 ही दुचाकी तुम्हाला बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. केवळ 6 हजार रुपये डाऊनपेमेंट भरुन तुम्ही ही दुचाकी घरी घेऊन जाऊ शकता.
मुंबई : देशभरात पेट्रोल दराने उच्चांक गाठला आहे. अनेक राज्यात पेट्रोल दर 100 पेक्षा जास्त रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. अशावेळी अनेक दुचाकीचालक इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री वाढत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसह जास्त मायलेज देणाऱ्या आणि कमीत कमी पेट्रोल खर्च होणाऱ्या गाड्यांना पसंती मिळत आहे. जर तुम्हीही अशी दुचाकी घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी भन्नाट पर्याय उपलब्ध आहे.
सध्या बाजारात बजाज सीटी 100 हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण बजाज सीटी 100 ही दुचाकी तुम्हाला बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. केवळ 6 हजार रुपये डाऊनपेमेंट भरुन तुम्ही ही दुचाकी घरी घेऊन जाऊ शकता.
या बाईकची किंमत 58,198 रुपये आहे. डाऊन पेमेंट भरल्यानंतर तुम्ही 36 महिन्यांच्या मुदतीवर कर्ज घेऊ शकता. कर्जाच्या हप्त्यांवर 9.7 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. म्हणजेच 36 महिन्यात तुम्हाला एकूण 67,392 रुपये द्यावे लागणार आहेत. या एकूण रकमेवर 15,194 रुपये व्याज द्यावं लागेल. तर दर महिन्याचा EMI 1872 रुपये इतका असेल.
36 महिने म्हणजे 3 वर्ष किंवा 60 महिने म्हणजे 5 वर्ष या मुदतीवरही तुम्ही कर्ज घेऊ शकता. मात्र 60 महिन्यात ही बाईक तुम्हाला एकूण 77,520 रुपयांना पडेल. यावर तुम्हाला 25,322 इतकं व्याज भरावं लागेल. 5 वर्षांचं जर कर्ज घेतलं तर तुम्हाला महिन्याचा EMI 1292 रुपये इतका भरावा लागेल.
दुचाकीची वैशिष्ट्ये
या बाईकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मायलेज. एक लिटर पेट्रोलमध्ये 91 किमीचं मायलेज ही बाईक देते.
या बाईकचं सस्पेन्शन उत्तम आहे, त्यामुळे रायडिंग कगरताना तुम्हाला आरामदायी प्रवास वाटेल
या बाईकला BS6 इंजिन आहे. इंजिन क्षमता 115.45cc आहे.
चार गियरबॉक्स आहेत. हे चार स्ट्रोक सिंगल सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक इंजिनसह उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या
ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर आता लवकरच बाजारात येणार, कंपनीने उचलले आणखी एक मोठे पाऊल