सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

भारतीय टू व्हीलर सेगमेंटमध्ये एका स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरने एंट्री घेतली आहे. या स्कूटरचे नाव बाउन्स इन्फिनिटी ई-1 (Bounce Infinity E1) असे आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंतची रेंज देते.

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर
Bounce Infinity E1
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 5:54 PM

Bounce infinity bike Price In India : भारतीय टू व्हीलर सेगमेंटमध्ये एका स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरने एंट्री घेतली आहे. या स्कूटरचे नाव बाउन्स इन्फिनिटी ई-1 (Bounce Infinity E1) असे आहे. या स्कूटरच्या प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बाउन्स इन्फिनिटी E1 2kWh लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंतची रेंज देते. (Bounce launches Infinity E1 at starting price of 36000 rupees)

ही स्कूटर 68,999 रुपये इतक्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे, जी बॅटरी आणि चार्जरसह येते. पण तुम्ही ही स्कूटर बॅटरीशिवायदेखील खरेदी करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ 36 हजार रुपये मोजावे लागतील.

मार्चमध्ये डिलीव्हरी सुरु

Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर पाच कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी मार्चमध्ये सुरू होईल. बाउन्सने इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरसह बॅटरी लाँच केली आहे. यासोबतच ग्राहकांना बॅटरीशिवाय स्कूटर खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. यामुळे कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी ठेवू शकली आहे.

Bounce Infinity E1 मध्ये 2kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 85 किमीची रेंज देऊ शकते. म्हणजेच या स्कूटरची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ती 85 किमीपर्यंत चालवता येते. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड 65KM इतका आहे.

Ola S1 ला टक्कर

Bounce Infinity E1 ही स्कूटर इतर ब्रँडच्या स्कूटर्सना जोरदार आव्हान देऊ शकते. हा ब्रँड Ola S1, Bajaj Chetak Electric, TVS iQube आणि Ather 450X साठी अडचणी निर्माण करु शकतो.

उत्पादनासाठी कोट्यवधींचा करार

बाऊन्सने अलीकडेच 22Motors ची100 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. कंपनीचा हा करार 70 लाख डॉलर्सचा आहे. या करारांतर्गत, Bounce ने भिवडी, राजस्थान येथे 22Motors चे प्रोडक्शन युनिट विकत घेतले आहे. येथे दरवर्षी कंपनी 1,80,000 स्कूटर तयार करु शकेल.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Bounce launches Infinity E1 at starting price of 36000 rupees)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.