4,111 रुपयांत घरी न्या शानदार कार, Tata च्या Tiago, Tigor, Nexon, Harrier वर 65,000 रुपयांचा डिस्काऊंट

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या स्वस्त सेडान कार टाटा टिगॉरवर बंपर डिस्काऊंटसह चांगला मासिक हप्ता (EMI) ऑफर करत आहे.

4,111 रुपयांत घरी न्या शानदार कार, Tata च्या Tiago, Tigor, Nexon, Harrier वर 65,000 रुपयांचा डिस्काऊंट
Tata Harrier
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 4:55 PM

मुंबई : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या स्वस्त सेडान कार टाटा टिगॉरवर बंपर डिस्काऊंटसह मासिक हप्ता (EMI) ऑफर करत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही या कारला फायनान्स करू शकता आणि दर महिन्याला फक्त 4,111 रुपये देऊन घरी आणू शकता. (Bring Tata Tigor by paying EMI of 4111 rupees, discount up to Rs 65000 on Tiago, Nexon, Harrier)

कारवर ईएमआय देण्याव्यतिरिक्त, कंपनी सवलत देखील देत आहे. Tigor व्यतिरिक्त, Tiago, Nexon आणि Harrier सारख्या कारवर सूट देण्यात आली आहे. यामध्ये Tata Tiago वर 20 हजार रुपयांची रोख सवलत देण्यात आली आहे. सोबत 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या Tiago NRG व्यतिरिक्त, सर्व व्हेरिएंटवर ही सवलत दिली जात आहे. दुसरीकडे, जर आपण Tigor बद्दल बोललो तर या कारवर 20 हजार रुपयांची रोख सवलत आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

Nexon वरही डिस्काउंट

टाटा नेक्सॉनच्या पेट्रोलवर चालणाऱ्या व्हेरिएंटवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. मात्र या कारच्या डिझेल व्हेरिएंटच्या डार्क एडिशन वगळता इतर सर्व मॉडेल्सवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या व्यतिरिक्त, tata nexon EV वर कोणतीही रोख सवलत नाही परंतु XU+ Lux ट्रिमवर 15,000 रुपये आणि XZ+ ट्रिमवर 10,000 रुपये एक्सचेंज बोनस मिळत आहे.

Tata Harrier वर 25 हजार रुपयांचा डिस्काउंट

Harrier वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर त्यावर 25,000 रुपयांची रोख सवलत दिली जात आहे. यामध्ये XZ+, XZA+ trim, Camo आणि Dark Edition मॉडेल्स वगळता सर्व व्हेरिएंट्सवर सूट देण्यात येत आहे. याशिवाय, या एसयूव्हीवर 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे, परंतु अपडेटेड डार्क एडिशनवर फक्त 25 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

या वाहनांव्यतिरिक्त, टाटा मोटर्स कंपनी प्रथमच त्यांच्या सफारीवर अधिकृत डील देत आहे. यामध्ये कोणतीही रोख सवलत दिली जात नाही, परंतु तुम्ही त्यावर 25 हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर सफारीच्या सर्व प्रकारांवर उपलब्ध आहे. या ऑफर्स आणि EMI बद्दलची माहिती रिपोर्ट्सनुसार दिली जात आहे. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपवर जाऊ शकता.

इतर बातम्या

MG मोटर इंडियाची 7 सीटर Gloster बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mahindra Bolero Neo ला भारतीयांची पसंती, एका महिन्याहून कमी कालावधीत 5500 बुकिंग्स

गडकरींच्या ‘सिक्सर’वर कार कंपन्या काय करणार? एअरबॅगनं तुमची कार, ड्रायव्हिंग किती बदलणार?

(Bring Tata Tigor by paying EMI of 4111 rupees, discount up to Rs 65000 on Tiago, Nexon, Harrier)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.