सिंगल चार्जवर 116 किलोमीटर रेंज, नव्या सब्सिडीमुळे ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 14,500 रुपयांनी स्वस्त
अवजड उद्योग विभागाने हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये (FAME II) उपलब्ध असलेल्या अनुदानासंदर्भात (सब्सिडी) काही महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या आहेत.
नवी दिल्ली : अलीकडेच अवजड उद्योग विभागाने (Department of heavy industries) हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये (FAME II) उपलब्ध असलेल्या अनुदानासंदर्भात (सब्सिडी) काही महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या आहेत. यासंदर्भात, विभागाने एक अधिसूचना देखील जारी केली आहे, त्याअंतर्गत देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनुदानाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे वाहनांच्या किंमती कमी होतील. (Buy Ather 450X electric scooter at cheaper price, FAME II subsidy cut price of Electric vehicles)
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना दिले जाणारे अनुदान आता 10 हजार रुपये प्रति kWh च्या ऐवजी 15 हजार रुपये प्रति KWh इतकं असेल. या उपक्रमाचा थेट परिणाम अॅथर 450 एक्स (Ather 450X) इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीवरही दिसून आला आहे. कंपनीने या स्कूटरची किंमत कमी केली असून एक्स्प्रेस ड्राइव्हमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार FAME II योजनेतील दुरुस्तीनंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 14,500 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
Ather 450X नवी किंमत किती असणार?
दिल्लीत या स्कूटरची किंमत 1,46,926 रुपये इतकी आहे, ज्यात आधीच्या अनुदानासह अॅथर डॉट / पोर्टेबल चार्जर देखील आहे. आता या नव्या अनुदानानंतर दिल्लीत या स्कूटरची किंमत 1,32,426 रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, बँगलोरमधील या स्कूटरची किंमत आधीच्या 1,59,000 रुपयांवरून 1,44,500 रुपयांपर्यंत कमी होईल.
या नवीन किंमती वेबसाइटवर अद्याप अपडेट केल्या गेल्या नाहीत, परंतु माध्यमांच्या अहवालानुसार ती लवकरच अपडेट केली जाईल. FAME II च्या अनुदानातील सुधारणेबाबत बोलताना अॅथर एनर्जीचे, सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता म्हणाले की, “FAME धोरणात केलेलं संशोधन, अनुदानात प्रति KWh मध्ये 50% केलेली हे एक अभूतपूर्व पाऊल आहे. देशात कोरोना साथीचा रोग पसरला आहे, परिस्थिती बिघडलेली असूनही इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत वाढ झाली आहे आणि या अतिरिक्त अनुदानामुळे आम्हाला इलेक्ट्रिक दुचाकींचिया विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. ”
कशी आहे Ather 450X?
मागील वर्षी, बंगळुरू-स्थित स्टार्ट-अपने (Ather) भारतीय बाजारात 450X आणि 450 प्लस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. Ather च्या प्रॉडक्ट लाइन अपमध्ये 450 प्लस आणि 450 एक्स असे दोन मॉडेल्स आहेत. 1.47 लाख रुपये किंमतीसह (एक्स-शोरूम, दिल्ली) ही स्कूटर लाँच करण्यात आली आहे. Ather 450X मध्ये 2.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असून जो 8 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करतो.
संबंधित बातम्या
एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध
अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार
(Buy Ather 450X electric scooter at cheaper price, FAME II subsidy cut price of Electric vehicles)