AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1.58 लाखांची बजाज Bajaj Pulsar अवघ्या 50 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Bajaj Pulsar 220 F BS6 मध्ये 220 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 20.4ps पॉवर आणि 18.55 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये यूजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील.

1.58 लाखांची बजाज Bajaj Pulsar अवघ्या 50 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Bajaj Pulsar 220 F BS6 (फोटो : बजाज ऑटो)
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 9:00 AM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. Bajaj Pulsar 220 F BS6 असं या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy Bajaj Pulsar 220 F BS6 in 50000 rupees, know where you can get great deals)

Bajaj ची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे. नवीन Bajaj Pulsar 220 F BS6 ची ऑन रोड किंमत जवळपास 1.60 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 50,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Bajaj Pulsar 220 F BS6 मध्ये 220 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 20.4ps पॉवर आणि 18.55 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये यूजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 38 किमी मायलेज देते.

bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2016 चे मॉडेल आहे. या बाईकने 45000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर बाइक आहे आणि ती मुंबईतल्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक या लिंकवर (https://www.bikedekho.com/used-bike-details/used-bajaj-pulsar-220-pulsar-220-f-bs6-bikes-mumbai_5f0f4e2c59e21f10aa59ddf6.htm) जाऊन या बाईकबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Wagon R अवघ्या 1.30 लाखात खरेदीची संधी

ऑफ रोड कार ते न्यू लँड क्रूझर, Maruti, Toyota यावर्षी एकापेक्षा एक गाड्या लाँच करणार

2022 Skoda Kodiaq SUV भारतात लाँच, Hyundai Tucson आणि Jeep Compass ला टक्कर

(buy Bajaj Pulsar 220 F BS6 in 50000 rupees, know where you can get great deals)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.