28000 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह Hero Electric स्कूटर्स खरेदी करा, 6 गाड्यांवर ऑफर

इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत

28000 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह Hero Electric स्कूटर्स खरेदी करा, 6 गाड्यांवर ऑफर
Hero Electric Scooter
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:11 PM

मुंबई ; इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) आणि बाईकची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने फेम II च्या (FAME II) अनुदानामध्येही बदल केला आहे, त्यानंतर या वाहनांची किंमत आणखी कमी झाली आहे. या वाहनांच्या किंमती हजारो रुपयांनी कमी झाल्या आहेत. (Buy Hero Electric Scooters with Bumper Discount of Rs 28000, Offer on 6 Scooters)

FAME II अनुदानाच्या दुरुस्तीनंतर, सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी त्यांच्या दुचाकी आणि स्कूटरची किंमत कमी केली आहे. हिरो इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीतही 12 ते 33 टक्क्यांनी कपात केली असून यामध्ये सर्वाधिक फायदा ट्रिपल बॅटरीसह येणाऱ्या Nyx HX स्कूटरमध्ये दिला जात आहे.

Hero Electric स्कूटर्सच्या नव्या किंमती

  • Hero Electric च्या Photon HX स्कूटरची कीमत में 8,491 रुपयांनी कमी झाली आहे. ही स्कूटर तुम्ही 71,449 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. पूर्वी या स्कूटरची किंमत 79,940 रुपये इतकी होती.
  • Optima HX सिंगल बॅटरीवाल्या स्कूटरची किंमत 61,640 रुपये इतकी आहे, जी आता 53,600 रुपये इतकी झाली आहे.
  • तुम्ही ऑप्टिमा ईआर (Optima ER) डबल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर 58,980 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पूर्वी त्याची किंमत 78,640 रुपये इतकी होती. कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत 19,660 रुपयांची कपात केली आहे.
  • Nyx E5 सिंगल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर 61,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पूर्वी त्याची किंमत 68,640 रुपये होती.
  • Nyx ER डबल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर पूर्वीच्या 83,940 रुपयांच्या तुलनेत 62,954 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
  • तुम्ही Hero Nyx HX ट्रिपल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर 85,136 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्कूटरच्या किंमतीत 27,979 रुपयांची कपात केली गेली असून यापूर्वी त्याची किंमत 1,13,115 रुपये इतकी होती.
  • हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) व्यतिरिक्त इतर कंपन्यादेखील त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ऑफर देत आहेत, ज्यात Ather, Revolt Motors इत्यादींचा समावेश आहे.

इतर बातम्या

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, कंपनीच्या संस्थापकांनी विचारलं तुम्हाला कोणता रंग हवा आहे?

अवघ्या 1.5 युनिट वीजेवर चार्ज होणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 20000 रुपयांचा डिस्काऊंट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी 28 हजार रुपयांनी स्वस्त

Hayabusa बाईकसारखा लूक आणि दमदार फीचर्स, तब्बल 400Kmph वेगाने धावणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात

(Buy Hero Electric Scooters with Bumper Discount of Rs 28000, Offer on 6 Scooters)

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.