Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

कंपनीने ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. तुम्हाला बाईकमध्ये 124cc सिंगल सिलिंडर इंजिन मिळते. हे 10.74ps पॉवर आणि 11Nm पीक टॉर्क देते. यामध्ये तुम्हाला 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे.

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी
Honda Cb Shine
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 3:42 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. होंडा सीबी शाइन (Honda CB Shine) असे या बाईकचे नाव आहे. (buy Honda CB Shine in just rs 27000, will get 1 year warranty too)

कंपनीने ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. तुम्हाला बाईकमध्ये 124cc सिंगल सिलिंडर इंजिन मिळते. हे 10.74ps पॉवर आणि 11Nm पीक टॉर्क देते. यामध्ये तुम्हाला 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. याच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकच्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम आणि डिस्क व्हेरिएंटच्या पुढच्या चाकात डिस्क आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळेल. या बाईकमध्ये तुम्हाला ट्युबलेस टायर्स मिळतील.

या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी दावा करते की, ही बाईक 65 किमी / लीटर इतकं मायलेज देते. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, CARS24 ही वेबसाईट जी सेकंड हँड वाहने खरेदी करते आणि विकते, या कंपनीच्या साइटवर ही होंडा सीबी शाईन सूचीबद्ध केली आहे. त्यावर या बाईकची किंमत 27 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचे मॉडेल 2014 चे आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक आतापर्यंत 17,000 किलोमीटर धावली आहे. बाईकची नोंदणी दिल्लीच्या DL-04 RTO ची आहे. आपल्याला या बाईकच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीसह मिळते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(buy Honda CB Shine in just rs 27000, will get 1 year warranty too)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.