Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 12.77 ते 17.61 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अर्ध्याहून अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Mahindra Scorpio (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 8:03 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (buy Mahindra Scorpio in just 380000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

कुठे मिळतेय ऑफर

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 12.77 ते 17.61 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अर्ध्याहून अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Mahindra Scorpio कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. CarDekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 3.8 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

दमदार इंजिन

या कारचा मेंटेनन्स खूप चांगला आहे. Mahindra Scorpio मध्ये 2179 चे इंजिन देण्यात आले आहे, जे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन 120 bhp पॉवर आणि 290 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मात्र, यामध्ये विम्याबद्दलची (इन्श्योरन्स) माहिती उपलब्ध नाही.

महिंद्र स्कॉर्पिओच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, त्यात एसी, हीटर, अॅडजस्टेबल स्टीयरिंग, रिअर वॉश वायपर, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडोज, रिमोट फ्युएल लीड ओपनर, लो फ्यूल वॉर्निंग लाइट, व्हॅनिटी मिरर, रिअर एसी व्हेंट, पार्किंग सेन्सर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्स

या कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या एसयूव्हीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग, कीलेस एंट्री, इमोबिलाइझ यांसारखे सेफ्टी फीचर्स यात आहेत. तथापि, आपण सीट बेल्टची क्वालिटी आणि स्थिती देखील तपासू शकता. अनेकदा सेकंड हँड कारमध्ये सीट बेल्टचे स्प्रिंग खराब झालेले असते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CarDekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी

Audi Q7 | 2022 ऑडी Q7 चे उत्पादन भारतात सुरू, दमदार फिचर्स, सुपर लूक, जाणून घ्या बहूचर्चित ऑडी Q7बद्द्ल सर्व काही

(buy Mahindra Scorpio in just 380000 rupees)

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.