86 हजारात घरी न्या Royal Enfield Himalayan, 12 महिन्यांच्या वॉरंटीसह स्पेशल ऑफर
रॉयल एनफील्डच्या या नवीन हिमालयन बाईकमध्ये बीएस 6 कंप्लायंट 411 सीसीचे सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन आहे जे 24.3bhp पॉवर आणि 32Nm पीक टॉर्क जनरेट करते.
मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत.अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. Royal Enfield Himalayan असे या बाईकचे नाव आहे. ही एक अॅडव्हेंचर बाईक आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy Royal Enfield Himalayan in 86000 rupees, special offer with 12 months warranty)
रॉयल एनफील्डच्या या नवीन हिमालयन बाईकमध्ये बीएस 6 कंप्लायंट 411 सीसीचे सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन आहे जे 24.3bhp पॉवर आणि 32Nm पीक टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त यात 5 स्पीड कॉन्स्टेंट मेश गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. क्लासिक 350 ड्युअल-चॅनेल एबीएस नंतर बीएस 6 एमिशन नॉर्म्सनुसार येणारी ही बाइक रॉयल एनफील्डची दुसरी बाईक आहे. यात ड्युअल-चॅनेल एबीएस हॅजार्ड स्विच, मजबूत ब्रेक मेकॅनिझम आणि चांगला साइड-स्टँड आहे.
या बाईकमध्ये तुम्हाला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS आणि ड्युअल चॅनेल मिळते. त्याची इंधन टाकी 15 लीटर क्षमतेची आहे. ही बाईक ऑप्टिमाइझ्ड हँडलबार 220Nm च्या ग्राउंड क्लिअरन्ससह येते. यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी असा दावा करते की, ही बाईक 45 किमीचे मायलेज देते, बाईकची सुरुवातीची किंमत 2 लाख 10 हजार आहे, तर टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 2.17 लाख रुपये मोजावे लागतील.
ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला सेकंड हँड व्हेईकल सेलिंग वेबसाइट CARS24 वर जावे लागेल. कंपनीने बाईकची विक्री येथे सूचीबद्ध केली आहे. या बाईकची किंमत 86 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक 2016 च्या मॉडेलची आहे आणि ही फर्स्ट ओनर बाईक आहे. बाईकने आतापर्यंत एकूण 22.059 किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याच वेळी, त्याची नोंदणी UP16 RTO ची आहे. कंपनी येथे बाईकसोबत एक वर्षाची वॉरंटीही देत आहे. याशिवाय, तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीदेखील दिली जात आहे.
महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.
इतर बातम्या
Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?
महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
(buy Royal Enfield Himalayan in 86000 rupees, special offer with 12 months warranty)