Electric Car घेताय? थोडी वाट पाहा, Mahindra, Tata, Hyundai च्या 4 इलेक्ट्रिक गाड्या लाँचिंगच्या मार्गावर
सध्या बाजारात अशी कोणतीही कंपनी नाही जी EV शी संबंधित प्लॅनिंग करत नाही. लोकांची ही वाढती आवड पाहता अनेक कार कंपन्या नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत.
मुंबई : भारतीय कार बाजार आता वेगाने बदलत आहे. हे घडत आहे कारण वाहनांबाबत लोकांची टेस्ट देखील बदलत आहे. आम्ही येथे ज्या टेस्टद्दल बोलत आहोत ती म्हणजे इलेक्ट्रिक वाहने (Electric Car) आहेत. लोक आता पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. यासोबतच ते पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबतही जागरूक होत आहेत. (cheap and affordable electric cars coming soon in India, Altroz EV, eXUV300, hyundai ev, eKUV100)
सध्या बाजारात अशी कोणतीही कंपनी नाही जी EV शी संबंधित प्लॅनिंग करत नाही. लोकांची ही वाढती आवड पाहता अनेक कार कंपन्या नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. यासोबतच वाहन कंपन्या भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून परवडणारी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावरही भर देत आहेत. EVs संदर्भात लोकांची सर्वात मोठी तक्रार ही आहे की इलेक्ट्रिक वाहने खूप महाग आहेत आणि ती सामान्य माणसाच्या बजेटमध्ये येत नाहीत. या तक्रारीवर मात करण्यासाठी आता टाटा, महिंद्रा, ह्युंडई आणि एमजी सारख्या मोठ्या कंपन्या लवकरच अशा ईव्ही आणत आहेत, ज्याची किंमत खूप कमी असेल. चला तर मग या आगामी वाहनांवर एक नजर टाकूया…
Mahindra eXUV300
महिंद्राच्या कार लाइन-अप मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक कॉम्पॅक्ट SUV XUV300 चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केले जाणार आहे. कंपनी या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल दोन रेंजमध्ये उपलब्ध करू शकते. एक स्टँडर्ड आणि एक लाँग रेंज. कार लॉन्च करण्याबाबतची परिस्थिती सध्या इतकी स्पष्ट नाही. पण 2023 पर्यंत हे वाहन लाँच होण्याची आशा आहे.
Tata Altroz EV
जर कोणतीही कंपनी EV वाहनांच्या बाबतीत सर्वोत्तम मार्गाने काम करत असेल तर त्यात टाटा सर्वात वर दिसेल. टाटाने आधीच नेक्सॉनला इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून बाजारात आणले आहे आणि आता या कंपनीने सेडान कार टिगॉरचे इलेक्ट्रिक मॉडेलही लॉन्च केले आहे. त्याचबरोबर टाटा लवकरच आपल्या प्रीमियम हॅचबॅक Altroz चे EV मॉडेल लाँच करणार आहे. हे वाहन पुढील वर्षापर्यंत येणे अपेक्षित आहे. तसेच, ही कार 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Mahindra eKUV100
महिंद्रा KUV100 ही कंपनीच्या लाइनअपमधील सर्वात लहान कार आहे. त्याची किंमत इतर महिंद्रा वाहनांपेक्षा कमी आहे, कारण ही कंपनीची एकमेव हॅचबॅक कार आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत देखील खूप कमी ठेवली जाईल. ही कार महिंद्रा 2022 मध्ये लाँच करेल असे म्हटले जात आहे. 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार याआधीच सादर केली आहे. ऑटो एक्सपोमध्ये दाखवलेल्या कारच्या मॉडेलमध्ये 15.9kWh ची बॅटरी होती, जी 150 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.
Hyundai
मारुती नंतर ज्या कंपनीची वाहने देशात सर्वाधिक विकली जातात ती कंपनी म्हणजे Hyundai. अशा स्थितीत Hyundai इलेक्ट्रिक वाहनांच्या विभागातही कशी मागे राहू शकते. Hyundai ने सर्वप्रथम इलेक्ट्रिक एसयूव्ही कोना लाँच केली. पण या कारला फारसे यश मिळू शकले नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे कारची किंमत. या कारची किंमत 25 लाख रुपये ठेवली होती. त्याचबरोबर, आता ह्युंडईला देशातील लोकांची टेस्ट समजली आहे आणि ही कंपनीसुद्धा कमी किंमतीची इलेक्ट्रिक वाहने बनवत आहे. या विशेष प्रकल्पासाठी कंपनीने शेकडो कोटींची गुंतवणूकही केली आहे. ह्युंडईची इलेक्ट्रिक कारदेखील 2022 मध्ये लाँच होऊ शकते.
इतर बातम्या
टाटाची नवी 10 लाख रुपयांची एसयूव्ही, जाणून घ्या काय आहे नाव आणि कधी होणार लाँच
निसान किक्स एसयूव्हीवर एक लाख रुपयांची सूट, विशेष लाभमध्ये 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील देतेय कंपनी
टेस्लाचे ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार, एक वर्षापासून सुरू आहे चाचणी
(cheap and affordable electric cars coming soon in India, Altroz EV, eXUV300, hyundai ev, eKUV100)