ढासू फीचर्स आणि शानदार लूकसह भारतातली पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँचिंगसाठी सज्ज

भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे आणि गेल्या वर्षभरात देशात अनेक इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर लॉन्च करण्यात आल्या आहेत. आता भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च होणार आहे.

ढासू फीचर्स आणि शानदार लूकसह भारतातली पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँचिंगसाठी सज्ज
Cyborg Yoda
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 6:30 AM

मुंबई : भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे आणि गेल्या वर्षभरात देशात अनेक इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर लॉन्च करण्यात आल्या आहेत. आता भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च होणार आहे. ‘सायबॉर्ग योडा’ (Cyborg Yoda) असे या बाईकचे नाव आहे. यात बॅटरी स्वॅपिंगची सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे युजर्स या बाईकची बॅटरी कुठेही सहज चार्ज करू शकतील. (Cyborg Yoda India’s first Electric Cruiser Bike Unveiled – First Look)

या बाईकच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, या बाईकला सिंगल चार्जवर 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळेल. कस्टमाईज्ड वाहने आणि ध्वनी अभियांत्रिकी निर्मितीमध्ये विशेषता असलेल्या स्वदेशी स्टार्टअप इग्निट्रॉन मोटोकॉर्पने भारतातील इलेक्ट्रिक बाईक्स सेगमेंटमध्ये सायबॉर्ग या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाईकसह एण्ट्रीची घोषणा केली आहे.

या बाईकबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, या बाईकची चाचणी अत्यंत खडतर परिस्थितीत आणि दुर्गम भागात करण्यात आली आहे. तसेच, या बाईकने बदलत्या हवामानाचाही सामना केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ignitron MotoCorp भारतीय बाजारपेठेत Cyborg नावाने तीन उत्पादने लॉन्च करणार आहे. कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप उत्पादन Yoda लॉन्च करेल, जे क्रूझर-शैलीचे बाईक मॉडेल असेल. ही बाईक बजाज अॅव्हेंजर सारखी दिसू शकते. युजर्सची गरज लक्षात घेऊन ही बाईक डिझाईन करण्यात आली आहे. युजर्सच्या गरजेनुसार यात काही बदल करण्यात आले आहेत आणि काही नवीन गोष्टीही जोडण्यात आल्या आहेत.

Cyborg Yoda चे फीचर्स

Cyborg Yoda ला LED टेललाईट्स आणि टर्न इंडिकेटर, कीलेस इग्निशन, अँटी-थेफ्ट अलार्म, पिलर बॅकरेस्ट, साईड पॅनियर बॉक्स आणि अॅडजस्टेबल सस्पेंशन सेटअप मिळतो. कंपनीने अद्याप त्याचे हार्डवेअर डिटेल्स उघड केलेले नाहीत. परंतु, बाईकच्या फोटोंवरून असे समजते की, याला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग शॉक एब्जॉर्बर दिले जातील.

Yoda ही या कंपनीची पहिली आणि भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल आहे. यात सहज बदलता येणारी बॅटरी मिळते. क्रूझर, रेग्युलर आणि स्पोर्ट्स सेगमेंटमधील इलेक्ट्रिक बाईक्सही या रेंजमध्ये सादर केल्या जाणार आहेत.

ई-चार्जिंग स्टेशन देखील तयार करतेय Cyborg

Cyborg एक ई-चार्जिंग स्टेशन देखील तयार करत आहे, जे युजर्सना चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देईल. हे कॉम्पॅक्ट होम चार्ज सॉकेट आहे, जे फास्ट चार्जिंग सुविधा देते, जे 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करू शकते. सेवा शुल्क, पुरवठा आणि सेवांसाठी ऑनलाइन पेमेंटद्वारे पैसे विक्रेत्याच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

(Cyborg Yoda India’s first Electric Cruiser Bike Unveiled – First Look)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.