Ducati ची पहिली इलेक्ट्रिक रेस मोटारसायकल लांचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Ducati MotoE Electric Race Motorcycle : Ducati ने आपली पहिली इलेक्ट्रिक रेस मोटरसायकल, MotoE चे अनावरण केले आहे.
Ducati MotoE Electric Race Motorcycle : Ducati ने आपली पहिली इलेक्ट्रिक रेस मोटरसायकल, MotoE चे अनावरण केले आहे. कंपनीने म्हटले आहे की 2023 च्या सीझनपासून ते FIM Enel MotoE वर्ल्ड कपसाठी मोटारसायकलची एकमेव पुरवठादार कंपनी बनेल, ज्या MotoGP वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या बॅटरीवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक क्लासच्या आहेत. (Ducati MotoE Electric Race Motorcycle to in 2022)
Ducati च्या नवीन इलेक्ट्रिक रेस बाईकचे प्रोटोटाइप कोड-नेम “V21L” असे ठेवण्यात आले आहे, जे डुकाटी कोर्स टीम आणि डुकाटी R&D इंजिनियर्सच्या संपूर्ण टीमने विकसित केलं आहे. ज्याचे नेतृत्व डुकाटी ईमोबिलिटीचे संचालक रॉबर्टो केन करत आहेत. 2013 पासून कंपनीचे टेस्ट रायडर असलेल्या मिशेल पिरो यांनी ही मोटरसायकल टेस्ट ट्रॅकवर नेली.
डुकाटी V21L चे स्पेसिफिकेशन्स
Ducati ने V21L चे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत कारण ते सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहेत, पण काही माहिती शेअर केली आहे. V21L वरील बहुतेक बॉडी पॅनेल कार्बन फायबरचे बनलेले आहेत जे दिसून येत आहेत, कारण बॅटरी पॅक कोणत्याही EV वरील सर्वात वजनदार घटकांपैकी एक आहे. कार्बन फायबरच्या वापरामुळे डुकाटी V21L चे वजन काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
ब्रेकिंग हार्डवेअर Brembo कडून मिळवले जाते आणि सस्पेंशन युनिट्स Ohlins कडून पुरवले जाते. इलेक्ट्रिक रेसिंग मोटरसायकलच्या विकासामध्ये, बॅटरी पॅकचा आकार आणि वजन खूप आव्हानात्मक होते. मोटारसायकलला कार्बन-फायबर स्विंगआर्म देखील मिळतील. डुकाटीने बाईकची आणखी एक चांगली गोष्ट ज्याकडे विशेष लक्ष दिले आहे ती म्हणजे रेस बाईकची कुलिंग सिस्टम.
2021 Ducati Hypermotard 950 लाँच
Ducati India ने गेल्या महिन्यात आपली नवीन मोटरसायकल लॉन्च केली आहे, या मोटरसायकलचे नाव 2021 Ducati Hypermotard 950 असे आहे. ही मोटरसायकल दोन व्हेरिएंटमध्ये येते, यामध्ये RVE आणि दुसऱ्या APC व्हेरिएंटचा समावेश आहे. 2021 डुकाटी हायपरमोटार्ड रेंज या वर्षी मे महिन्यात जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बाईक भारतात लाँच करण्यात आली आहे. 937 सीसी ट्विन सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दोन्ही व्हेरिएंटमध्ये वापरले गेले आहे, जे जुन्या व्हर्जनपेक्षा हलके तसेच अधिक शक्तिशाली आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 112 Bhp पॉवर जनरेट करू शकते, तर 7250 rpm वर 96 Nm टॉर्क निर्माण करू शकते.
2021 Ducati Hypermotard 950 मोटरसायकलमध्ये न्यू स्टल ट्रेलिस फ्रेम वापरली आहे. जी मागील पॅनलवरील सबफ्रेमला कनेक्ट होते. याला RVE मॉडेल देण्यात आले आहे, जे पिरेली डिआब्लो रोसो थर्ड टायरसह अॅल्युमिनियम व्हील्ससह येते. तर SP व्हेरियंटमध्ये हल्के टायर वापरण्यात आले आहेत. 2021 Ducati Hypermotard 950 च्या RVE व्हेरियंटची किंमत 12.99 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप-स्पेस Hypermotard 950 SP व्हेरिएंटची किंमत 16.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 1000 किमी रेंज, Tesla ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक सेडान सज्ज
5 लाखांहून कमी किंमतीत घरी आणा सेकेंड हँड SUV, Mahindra Thar सह अनेक पर्याय उपलब्ध
(Ducati MotoE Electric Race Motorcycle to in 2022)