आता पेट्रोल पंपावरही ई-वाहन चार्ज करता येणार, HPCL 5000 पंपांवर EV चार्जिंग स्टेशन उभारणार

ते पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कंपनीच्या पेट्रोल पंपावर पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असतील. याद्वारे लोक पेट्रोल पंपवरच त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकतील. यासोबतच सुराणा यांनी असेही सांगितले की, अधिक स्थानकांवर सीएनजीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या 800 पेट्रोल पंपावर सीएनजी उपलब्ध आहे आणि येत्या काळात आणखी स्थानकांवर ते उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.

आता पेट्रोल पंपावरही ई-वाहन चार्ज करता येणार, HPCL 5000 पंपांवर EV चार्जिंग स्टेशन उभारणार
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 6:23 PM

नवी दिल्लीः देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे. लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अनेक ऑटो कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे काम करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे. आता देशात EV चार्जिंग स्टेशनची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. पेट्रोलियम कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) पाच हजार पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार आहे.

कमी पेट्रोल पंपावर EV चार्जिंग स्टेशन

एचपीसीएलचे सीएमडी मुकेश कुमार सुराणा यांनी ही माहिती दिली. झी बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत सुराणा यांनी सांगितले की, 5000 पेट्रोल पंपांवर EV चार्जिंग स्टेशन बसवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. काही पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आधीच बसवण्यात आलेत. ते पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कंपनीच्या पेट्रोल पंपावर पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असतील. याद्वारे लोक पेट्रोल पंपवरच त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकतील. यासोबतच सुराणा यांनी असेही सांगितले की, अधिक स्थानकांवर सीएनजीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या 800 पेट्रोल पंपावर सीएनजी उपलब्ध आहे आणि येत्या काळात आणखी स्थानकांवर ते उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.

वाहनांसाठी हायड्रोजन इंधनावर काम सुरू

याशिवाय सुराणा हायड्रोजन इंधनाबद्दल देखील बोलले. ते म्हणाले की, वाहतुकीसाठी हायड्रोजन इंधन तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुराणा यांनी सांगितले की, वाहतुकीसाठी हायड्रोजनच्या वापरावर प्रयोग केले जात आहेत, याला थोडा वेळ लागू शकतो, कारण त्याची इकोसिस्टम तयार करावी लागेल. आणि त्याचे आर्थिक पैलूसुद्धा वेगळे आहेत. सुराणा म्हणाले की, यासाठी रिफायनरीमध्येही बदल केले जात आहेत.

दोन्ही कंपन्यांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात झपाट्याने विस्तार

देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असलेल्या महिंद्रा ऑटो आणि टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार (EV) बनवण्याचे काम करीत आहे. दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात झपाट्याने विस्तारत आहेत. इलेक्ट्रिक बाइक किंवा दुचाकी (स्कूटर आणि बाईक) च्या क्षेत्रात देखील एक कठीण स्पर्धा आहे. ई-बाइक्सच्या विभागात अनेक कंपन्या बाजारात दाखल झाल्यात, ज्यात टीव्हीएस, बजाज आणि हिरोची नावे आहेत. या कंपन्यांनी याआधीच बाजारात ई-बाईक्स लाँच केल्यात. या कामातील सर्वात नवीन कंपनी ओला आहे, जिने आकर्षक किमतीत ई-स्कूटरची विक्री सुरू केली.

संबंधित बातम्या

86 हजारात घरी न्या Royal Enfield Himalayan, 12 महिन्यांच्या वॉरंटीसह स्पेशल ऑफर

या 3 स्कूटरला ग्राहकांची मिळतेय सर्वाधिक पसंती, प्रति तास देतात 62 किमी मायलेज

E vehicles can now be charged at petrol pumps, HPCL to set up EV charging stations at 5000 pumps

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.