VIDEO | हैदराबादमध्ये Formula 4 Indian Championship ला झेंडा, जागतिक दर्जाची स्पर्धा भारतात

हैदराबाद : हे शहर बिर्याणी, चारमिनारमुळे प्रसिद्ध आहे. परंतु आता एका वेगळ्या कारणासाठी हे शहर ओळखलं जाणार आहे. कारण फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप ही स्पर्धा यावेळी हैदराबाद येथे होत आहे.

VIDEO | हैदराबादमध्ये Formula 4 Indian Championship ला झेंडा, जागतिक दर्जाची स्पर्धा भारतात
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 10:52 PM

हैदराबाद : हे शहर बिर्याणी, चारमिनारमुळे प्रसिद्ध आहे. परंतु आता एका वेगळ्या कारणासाठी हे शहर ओळखलं जाणार आहे. कारण फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप ही स्पर्धा यावेळी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवारी या स्पर्धेसाठी झेंडा दाखवण्यात आला आहे. जागतिक दर्जाची ही स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार आहे. (Flag of for Formula 4 Indian Championship in Hyderabad, world class competition in India)

तेलंगणाचे आयटी उद्योग मंत्री आणि महापालिका प्रशासन, उद्योग आणि वाणिज्य मंत्री कलवकुंतला तारका रामा राव (Kalvakuntla Taraka Rama Rao) आणि दक्षिण भारतीय अभिनेता विशाल (Actor Vishal) यांच्यासह रविवारी हैदराबादच्या माधापूर येथे ‘फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप’ चे उद्घाटन झालं. हैदराबाद येथे होणारी जागतिक दर्जाची एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट फेब्रुवारी 2022 मध्ये चार शहरांमध्ये होणार आहे.

व्हिडीओ पाहा

हैदराबाद शहर पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी F3 स्ट्रीट सर्किट शर्यतीला झेंडा दाखवला. ही स्पर्धा शहरातील आयकॉनिक केबल पुलापासून सुरू करण्यात आली आणि कार्यक्रमस्थळी संपली. रेसिंग प्रमोशनच्या सध्याच्या प्रयत्नांविषयी बोलताना रेसिंग प्रमोशनचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी म्हणाले की, “मोनॅको एक सार्वभौम शहर-राज्य असल्याने तिथे एफ 1 ड्रायव्हर्स तयार झाले आहेत आणि आपल्याकडे एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अनेक इच्छुक रेसिंग ड्रायव्हर्सना संधी देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.

भारतातील रेसिंग ड्रायव्हर्ससाठी मोठं व्यासपीठ

ते पुढे म्हणाले की, “आम्ही मोटरस्पोर्ट्सच्या दीर्घकालीन विकासामध्ये गुंतवणूक करण्यास आणि भारतातील रेसिंग ड्रायव्हर्ससाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत, रेसिंगचा पहिला सीझन फेब्रुवारी -22 रोजी नवी दिल्ली, चेन्नई, कोइंबतूर आणि हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा जगभरातील रेसिंग टॅलेटला आकर्षित करेल.

आरपीपीएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नवजीत गडोके पुढे म्हणाले, “आमची गुंतवणूक भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये क्रांती घडवून आणेल आणि मोटरस्पोर्ट्ससाठी जागतिक दर्जाची, समग्र इकोसिस्टम तयार करणे हे उद्दिष्ट आहे.

एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट हैदराबादमध्ये

रेसिंग प्रमोशन्सची नवीन इनिंग देशभरात नियोजित स्पर्धांसह भारतातील दीर्घकालीन रेसिंग कल्चरच्या नवीन युगाची सुरुवात करेल. येत्या काही महिन्यांत, रेसिंग प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड FIA द्वारे प्रमाणित फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप आयोजित करेल. आरपीपीएल शहर आधारित लीगला “इंडियन रेसिंग लीग” च्या रूपाने Q1 2022 मध्ये पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे. तसेच हैदराबादमधील भारतातील पहिलं एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट देखील वेळापत्रकानुसार आहे!

आपल्या मातीत जागतिक दर्जाच्या रेसिंग कार्स पाहणे ही भावना जबरदस्त!

आरपीपीएलचे जॉइंट एमडी, अरमान इब्राहिमदेखील लाँचिंगवेळी उपस्थित होते, ते यावेळी म्हणाले की, आपल्या मातीत जागतिक दर्जाची उपकरणे आणि रेसिंग कार्स पाहणे जबरदस्त आहे. आम्ही अखिलेश आणि नवजीत यांचे आमच्या कंपनीमध्ये स्वागत करतो, आणि चॅम्पियनशिपची एक सिरीज तयार करण्यास उत्सुक आहोत ज्यामुळे भारतीय ड्रायव्हर्स जागतिक स्तरावर, उच्च स्तरावरील स्पर्धेत उतरू शकतील आणि भारतीयांना मोटरस्पोर्ट जगात पॉवरफुल बनवतील.

इतर बातम्या

तालिबानकडून अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं वक्तव्य, क्रिकेट संघाच्या कर्णधाराची तालिबान अधिकाऱ्यांनी घेतली भेट, म्हणाले…

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह कपिलदेव यांचे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत संधी

(Flag of for Formula 4 Indian Championship in Hyderabad, world class competition in India)

Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.