Car : ह्युंदाईच्या नवीन वेन्यूची ‘ही’ खास फीचर्स पाहिलीत काय?

वेन्यू एसयुव्ही मल्टीपल ड्राइव्हसह उपलब्ध होणार आहे. यात अलेक्सा आणि गुगल व्हाइस असिस्टेंट सपोर्टची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. व्हाइस असिस्टेंट 10 विभागीय भाषांना समजण्यासाठी सक्षम राहणार असून यातील साउंड क्वॉलिटीदेखील उत्तम राहणार आहे.

Car : ह्युंदाईच्या नवीन वेन्यूची ‘ही’ खास फीचर्स पाहिलीत काय?
प्रतिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:57 PM

मुंबई :  ह्युंदाई (Hyundai) कंपनीने आपल्या सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही वेन्यू फेसलिफ्टला (SUV Venue Facelift) भारतात लाँच केले आहे. यात कंपनीकडून देण्यात आलेली आकर्षक फीचर्स आणि दमदार लूक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. कंपनीने वेन्यू मॉडेलला 2019 मध्ये लाँच केले होते. तीन वर्षांनंतर कंपनीने याच्या डिझाईन आणि स्टाइलमध्ये बदल केलेले दिसून येत आहेत. सोबत टेक्नोलॉजीला (Technology) अपडेट करुन नवीन फीचर्ससह ही कार नव्याने लाँच केली आहे. भारतात या कारची किंमत 7.53 लाख रुपयांपासून (एक्सशोरुम) सुरु होत आहे. या कारमध्ये अन्य कुठले फीचर्स आहेत, त्याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

  1.  नवीन एसयुव्ही वेन्यूमध्ये ग्रीलचे डिझाईन आणि लाइटिंग पॅटर्न न्यू Tucson सारखे दिले आहे. याच्या रियर सेक्शनमध्ये दोन एलईडी लाइट देण्यात आले असून दोन एलईडी टेललाइट्‌सला ते जोडण्यात आले आहे. याचे रियर बंपन IONIQ इलेक्ट्रिक क्रासओव्हरने प्रभावित झाले आहेत.
  2. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वेन्यू तीन इंजिन कॅटेगिरीसह विक्रीसाठी उपलब्ध होणार असून यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळणार आहे.
  3. 1.2 लीटर पेट्रोल युनिट इंजिन केवळ 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्ससह येणार असून 1.0 लीटर टर्बो पेट्रोलमध्ये 6 स्पीड iMT आणि ऑटोमॅटीक 7 स्पीड डीसी असे दोन्ही पर्याय मिळणार आहे. तसेच 1.5 लीटर ऑइल बर्नरबाबत बोलायचे झाल्यास हे 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबाक्ससह उपलब्ध होणार आहे.
  4. ह्युंदाई फेसलिफ्टचे 1.2 लीटर इंजिन मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.53 लाख रुपये आहे. तर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या मॉडेलची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये (एक्सशोरुम) असणार आहे.
  5. ही एसयुव्ही मल्टीपल ड्राइव्हसह उपलब्ध होणार आहे. यात अलेक्सा आणि गुगल व्हाइस असिस्टेंट सपोर्टची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. व्हाइस असिस्टेंट 10 विभागीय भाषांना समजण्यासाठी सक्षम राहणार असून यातील साउंड क्वॉलिटीदेखील उत्तम राहणार आहे.
  6. ह्युंदाई वेन्यू 30 हून अधिक ॲडव्हांस सेफ्टी फीचर्ससह उपलब्ध होत आहे. यात 6 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरींग सुविधा असणार आहेत.
  7. आपल्या सेगमेंटमध्ये ही पहिली अशी बजट कार असले ज्यात ड्रायव्हरसाठी पॉवर्ड सीट असणार आहे. सोबत ऑटोमॅटीक चालणारे हेल्थी एअर प्युरीफायर असणार आहे. याशिवाय वायरलेस चार्जर आणि पेडल शिफ्टर्सची सुविधाही मिळणार आहे.
  8. वेन्यूमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, डार्क क्रोम फ्रंट ग्रील आणि 16  इंच अलॉय व्हील्स मिळतील.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.