AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Hero Moto Corpचे देशभरात 6 कारखाने आहेत, त्यांची उत्पादन क्षमता जवळपास 90 लाख आहे. Hero MotoCorp व्यतिरिक्त Maruti Suzuki आणि Tata Motors यांनीही वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केलीय.

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार 'हिरों'सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती
हिरो मोटोकॉर्प
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 2:12 PM
Share

मुंबई : देशातील एक प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी Hero Moto Corpनं स्कूटर आणि मोटरसायकलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केलीय. स्कूटर आणि मोटारसायकलच्या एक्स-शोरूम किंमती 2000 रुपयांपर्यंत वाढवल्या जातील, असं कंपनीनं म्हटलंय. या दरवाढीची नेमकी किंमत मॉडेल आणि बाजारावर अवलंबून असेल, असं हिरो मोटोकॉर्पनं स्पष्ट केलंय.

मारुतीची घोषण्ा Hero Moto Corpचे देशभरात 6 कारखाने आहेत, त्यांची उत्पादन क्षमता जवळपास 90 लाख आहे. Hero MotoCorp व्यतिरिक्त Maruti Suzuki आणि Tata Motors यांनीही वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केलीय. मारुतीनं 1 जानेवारीपासून कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. खर्च वाढल्यानं किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं कंपनीनं म्हटलंय.

‘दरवाढ करण्यावाचून पर्याय नाही’ होंडा कार्स, टाटा मोटर्स (Tata Motors) आणि रेनॉल्ट(Renault)सारख्या कार निर्मात्यांनीही वाढत्या किंमतीचे कारण देत जानेवारीपासून वाहनांच्या किंमती वाढवण्याची योजना आखलीय. दुसरीकडे, टाटा मोटर्सनं सांगितलं, की कच्च्या मालाच्या किंमती आणि इतर खर्च वाढतच आहेत. दरवाढ कमी करण्यासाठी गाड्यांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेणं गरजेचं झालंय.

जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्या ऑडी (Audi) आणि मर्सिडीज बेंझ(Mercedes India)सारख्या कंपन्या पुढच्या महिन्यापासून वाहनांच्या किंमती वाढविणार आहेत. रेनॉल्ट इंडियानं सांगितलं, की ते जानेवारीपासून कारच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. ही फ्रेंच कंपनी भारतीय बाजारात Kwid, Triber आणि Kiger यासारखी मॉडेल्स विकते. दरम्यान, गेल्या वर्षभरात स्टील, अॅल्युमिनियम, तांबं, प्लास्टिकच्या किंमती वाढल्या आहेत. या वाढीचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवरही दिसून आलाय.

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

महागाई गॅसवर तरीही आकडेवारी ‘उज्वल’! उज्वला योजनाचे आतापर्यंत 80.5 लाख लाभार्थी

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.