ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह हिरो मोटोकॉर्पची Pleasure+ XTec स्कूटर बाजारात, Activa 6G ला टक्कर

चाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवीन स्कूटर देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव प्लेझर प्लस एक्सटेक (Pleasure plus XTec) आहे.

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह हिरो मोटोकॉर्पची Pleasure+ XTec स्कूटर बाजारात, Activa 6G ला टक्कर
Pleasure plus XTec 110
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 6:38 PM

मुंबई : दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवीन स्कूटर देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव प्लेझर प्लस एक्सटेक (Pleasure plus XTec) आहे. ही स्कूटर देशभरातील कंपनीच्या डीलर्सकडे उपलब्ध असेल आणि ती दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरच्या XL व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 61,990 रुपये आहे, तर Pleasure plus XTec 110 ची सुरुवातीची किंमत 69,500 रुपये आहे, जी एक्स-शोरूम किंमत आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह साइड स्टँड इंजिन कटऑफ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. (Hero Pleasure Plus Xtec Launched in Price 69,500 rupees, Rival for Activa 6G Rival)

दिवाळीपूर्वी सणासुदीचा फायदा घेण्यासाठी हिरो मोटरकॉर्पने ही स्कूटर सादर केली आहे. या स्कूटरमध्ये अनेक उत्तर आणि अॅडव्हान्स्ड फीचर्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, कॉल आणि एसएमएस अलर्टसह येते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असलेली ही स्कूटर अधिक चांगल्या प्रकारे वापरली जाऊ शकते. यामध्ये एक आयडन स्टॉप स्टार्ट सिस्टमसह i3S टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

दमदार इंजिन

Pleasure + XTec कंपनीने एकूण 7 कलर व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे, ज्युबलियंट यलो या एका खास रंगात सादर करण्यात आली आहे आणि हा रंग तरुणांना आकर्षित करू शकतो. या स्कूटरमध्ये कंपनीने 110.9cc चे इंजिन वापरले आहे, जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर काम करते.

फ्यूल इंजेक्टेड इंजिन 7000 आरपीएमवर 8.0 बीएचपी पॉवर जनरेट करते, तर 5500 आरपीएमवर 8.70 एनएम टॉर्क जनरेट करते. यात सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आली आहे. समोर आणि मागच्या बाजूला 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत.

Pleasure + XTec मध्ये काय आहे खास

हिरो मोटोकॉर्पने या स्कूटरमध्ये प्रोजेक्टर हेडलाइटचा वापर केला आहे, जी या सेगमेंटमध्ये प्रथमच पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या मते, या स्कूटरची हेडलाइट 25% अधिक स्पष्टता देते. याशिवाय कंपनीने साइड व्ह्यू मिररवर क्रोम ट्रीटमेंटही दिली आहे ज्यामुळे ती आणखी सुंदर बनते. यात मफलर प्रोजेक्टर, हँडल बार, सीट बॅक रेस्टसह ड्युअल टोन सीट आहे. 106 किलोच्या या स्कूटरमध्ये 4.6 लीटर इंधन क्षमता असलेली टाकी आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Hero Pleasure Plus Xtec Launched in Price 69,500 rupees, Rival for Activa 6G Rival)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.