Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBD2B कंप्लायंट शाईन 100 बाईक लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स एका क्लिकवर

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने नवीन OBD2B-कंप्लायंट शाईन 100 भारतात लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 68,767 रुपये आहे. यात नवीन ग्राफिक्स, आकर्षक डिझाइन आणि कंपनीचा लोगो तसेच सुधारित इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

OBD2B कंप्लायंट शाईन 100 बाईक लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 8:23 PM

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली नवीन OBD2B-कंप्लायंट शाईन 100 बाईक भारतात लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत 68,767 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही गाडी याच व्हेरियंटमध्ये 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक भारतभरातील HMSI डीलरशिपवर उपलब्ध आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाईक स्टायलिश, किफायतशीर आहे आणि नवीन प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करते. एंट्री लेव्हल सेगमेंटमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

HMSI ने आपली नवीन शाईन 100 बाईक ‘अमेजिंग शाइन ऑफ न्यू इंडिया’ या टॅगलाईनसह सादर केली आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली आणि स्टायलिश बाईक हवी आहे त्यांच्यासाठी ही बाईक खास डिझाइन करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक कमी पेट्रोलमध्ये जास्त चालेल आणि त्याचा मेंटेनन्स कॉस्टही कमी असेल.

लूक आणि डिझाइन

नवीन अपडेटेड होंडा शाईन 100 चे डिझाइन शाईन 125 पासून प्रेरित आहे. यात बॉडी पॅनेलवर नवीन ग्राफिक्स आणि होंडाचा लोगो देण्यात आला आहे. याचे आकर्षक फ्रंट काऊल, ब्लॅक अलॉय व्हील्स, अ‍ॅ ल्युमिनियम ग्रॅब रेल, लांब आणि आरामदायक सीट आणि स्लीक मफलर यामुळे हे आणखी स्टायलिश झाले आहे. ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ ऑरेंज, ब्लॅक विथ ग्रे आणि ब्लॅक विथ ग्रीन अशा 5 आकर्षक कलर ऑप्शनमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.

पॉवर आणि ब्रेकिंग-सस्पेंशन

नवीन होंडा शाईन 100 मध्ये 98.98 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे नवीन ओबीडी 2 बी उत्सर्जन नियमांचे पालन करते. हे इंजिन 7500 RPM वर 7.28 हॉर्सपॉवर आणि 5000 आरपीएमवर 8.04 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. OBD2B म्हणजे ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक, सेकंड जनरेशन, भारत स्टेज आणि ही प्रणाली वाहनाच्या इंजिन आणि उत्सर्जन प्रणालीवर लक्ष ठेवते आणि काही समस्या असल्यास अलर्ट करते. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. ही बाईक हलक्या, पण मजबूत डायमंड टाईप फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ट्विन रियर शॉक अ‍ॅब्जॉर्बर आहेत. सुरक्षिततेसाठी यात दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक आणि सीबीएस देण्यात आली आहे.

होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.