Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

नवीन वर्षाची सुरुवात होताच कार उत्पादक आता त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) या ब्रँडची सर्वाधिक लोकप्रिय वाहनं 7,000 रुपयांनी वाढली आहेत.

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती
ह्युंदाई i20-cars
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 4:48 PM

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात होताच कार उत्पादक आता त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. तर कच्चा माल आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे. वर्षाच्या सुरुवातीला कारच्या किंमती वाढवणं ही काही आश्चर्याची बाब नाही. ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) या ब्रँडची सर्वाधिक लोकप्रिय वाहनं 7,000 रुपयांनी वाढली आहेत. या ठिकाणी पेट्रोल व्हेरियंटवर 2,100 रुपयांपर्यंत आणि डिझेल व्हेरिएंटवर 4,100 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

Hyundai Alcazarच्या किंमती कमाल 22,000 रुपयांनी वाढल्या आहेत. Hyundaiनं i20 आणि i20 N-Lineच्या किंमती कमाल 6,800 रुपयांनी वाढवल्या आहेत. Grand i10 Nios आणि Aura या दोन्ही गाड्यांची किंमत 7,300 रुपयांपर्यंत वाढली आहे. निवडलेल्या प्रकारानुसार सॅन्ट्रोची किंमत रु. 10,000 ते रु. 17,400पर्यंत वाढली आहे. वर्ना 4,000 रुपयांपर्यंत महाग झाली आहे. विशेष म्हणजे नवीन दरवाढीचा Hyundai Tucson, Elantra आणि Kona EVवर कोणताही परिणाम झालेला नाही.

ह्युंदाई कारच्या अद्ययावत किंमती Hyundai Santro – 4.76 लाख ते 6.44 लाख रुपये Hyundai Grand i10 Nios – 5.28 लाख ते 8.51 लाख रुपये Hyundai Aura – 5.99 लाख ते 9.37 लाख रुपये Hyundai i20 – 6.98 लाख ते 11.47 लाख रुपये Hyundai i20 N-Line – 9.84 लाख ते 11.97 लाख रुपये Hyundai Verna – 9.28 लाख ते 15.36 लाख रुपये Hyundai Venue – 6.99 लाख ते 11.87 लाख रुपये Hyundai Creta – 10.23 लाख ते 17.94 लाख रुपये Hyundai Alcazar – 16.30 लाख ते 20.14 लाख रुपये Hyundai Elantra – 17.86 लाख ते 21.13 लाख रुपये Hyundai Tucson – 22.69 लाख ते 27.47 लाख रुपये Hyundai Kona EV – 23.79 लाख ते 23.97 लाख रुपये

आणखीही काही मॉडेल्स येणार Tucson SUV लवकरच भारतात नवीन जनरेशनमध्ये सादर केली जाईल आणि Kona EV फेसलिफ्टदेखील या वर्षी बाजारात येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, दक्षिण कोरियाच्या कार जायंटकडे पाइपलाइनमध्ये आणखी काही मॉडेल्स आहेत. ब्रँडनं काही काळापूर्वी क्रेटा फेसलिफ्ट जागतिक स्तरावर सादर केली होती, जी या वर्षी भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. मेकर व्हेन्यू फेसलिफ्ट आणि नेक्स्ट-जनरल वर्नावरदेखील काम करत आहे.

Driving Course : कार घ्यायचीय, पण चालवता येत नाही? मारुती सुझुकीनं आणलेत नवीन कोर्स, फीस किती? वाचा

इलेक्ट्रिक वाहनांच्या तेजीतून करायची कमाई, तर निफ्टी ऑटो ईटीएफमध्ये करा गुंतवणुकीची तयारी

2022 Yamaha FZS-Fi DLX भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.