Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री
एसयूव्ही सेगमेंटमधील प्रसिद्ध नाव ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta) ही भारतातील आपल्या कारच्या श्रेणीत एक बेस्टसेलर कार ठरली आहे.
मुंबई : एसयूव्ही सेगमेंटमधील प्रसिद्ध नाव ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta) ही भारतातील आपल्या कारच्या श्रेणीत एक बेस्टसेलर कार ठरली आहे. यावेळी, ह्युंदायने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. क्रेटा एसयूव्हीने आतापर्यंतची देशातील सर्वाधिक विक्री करणारी कार म्हणून मारुती सुझुकी स्विफ्टला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने प्रथमच देशातील इतर कोणत्याही ब्रँडसमोर पराभव पत्करत आपले पहिले स्थान गमावले आहे. (Hyundai Creta Become best selling car in india deafening Maruti Suzuki Swift)
गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने स्विफ्टच्या 7,005 युनिट्सची विक्री केली होती, तर ह्युंदायने मे 2021 मध्ये याच काळात क्रेटाच्या 7,527 युनिट विक्रीची नोंद केली आहे. क्रेटा देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून समोर आली आहे. मे 2021 मध्ये मारुती सुझुकीची विक्री घटली. तथापि, कोव्हिड – 19 च्या दुसर्या लाटेमुळे बर्याच राज्यांत लावण्यात आलेल्या लॉकडाउन आणि निर्बंधाच्या परिस्थितीतही ह्युंदाय क्रेटा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट या दोन्ही गाड्यांची विक्री चांगली झाली आहे.
ह्युंदाय क्रेटा एसयूव्हीने पाच स्थानांची झेप घेत मे महिन्यात अव्वल स्थान गाठले आहे. सर्व सेगमेंटधील वाहन विक्रीला मोठा फटका बसला असला तरी, या एसयूव्हीने गेल्या महिन्यात चांगले काम केले आहे. मे महिन्यात क्रेटाला ‘इंडियाज बेस्ट सेलिंग कार’ हा किताब मिळाला आहे. एप्रिलमध्ये 12,463 युनिट्सच्या तुलनेत मे महिन्यात ह्युंदायने क्रेटा एसयूव्हीच्या 7,527 वाहनांची विक्री केली आहे.
Hyundai Creta अपडेट होणार
मार्केटमधील स्पर्धा आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात, ह्युंदाय कंपनी क्रेटा एसयूव्हीमधील फीचर्स अपडेट करण्याचा विचार करीत आहे. ह्युंदाय क्रेटाच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये OTA अपडेट आणि नवीन व्हॉईस कमांड प्राप्त होतील. मॉडेलच्या बेस व्हेरिएंट्समध्ये निवडक फीचर्स हटवले जातील. ह्युंदाय इंडिया क्रेटामधील फीचर्स बदलण्यास तयार आहे. वेबवर लीक झालेल्या इमेजेस सेटनुसार, या कारच्या बेस व्हेरिएंटमधील काही फीचर्स कमी होतील. इतर सर्व व्हेरिएंटमध्ये फीचर एन्हांसमेंट असेल.
लीक झालेल्या फोटोंच्या आधारावर Hyundai Creta चं E व्हेरिएंट आता इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs, ORVMs वर टर्न इंडिकेटर, लगेज लँप आणि पॅसेंजर सीट बॅक पॉकेटसारख्या सुविधांनी सुसज्ज नसेल. मॉडलच्या EX आणि S व्हेरिएंटमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सारखे फीचर्स मिळू शकतात.
इतर बातम्या
Hyundai Grand i10 Nios क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
Isuzu वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री
(Hyundai Creta Become best selling car in india deafening Maruti Suzuki Swift)