Tata, Mahindra ते Maruti, भारतातील टॉप 21 कार्सचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट, जाणून घ्या कोणती कार किती सुरक्षित
सध्या भारतात सर्वाधिक रस्ते अपघातांची नोंद होत आहे. त्यामुळे, जर आता तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर NCAP-सर्टीफाय (प्रमाणित) कार घेणे हाच योग्य निर्णय असेल.
मुंबई : सध्या भारतात सर्वाधिक रस्ते अपघातांची नोंद होत आहे. त्यामुळे, जर आता तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर NCAP-सर्टीफाय (प्रमाणित) कार घेणे हाच योग्य निर्णय असेल. भारतात, कार खरेदी करताना सेफ्टी मीटरकडे सहसा लक्ष दिले जात नाही. याशिवाय युजर्सना कार खरेदी करताना सुरक्षेबाबतही माहिती नसते. मात्र, आता ती वेळ आली आहे, की आपल्याला कार खरेदी करताना तिच्या सेफ्टी मीटर्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Indian cars tested at Global NCAP 2021, check 21 famous cars safety report)
महिंद्र XUV700 ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. हे 5 स्टार रेटिंग प्राप्त करण्यासाठी, XUV700 चे वजन 110 किलो कमी होते.
महिंद्रा XUV300
Mahindra XUV300 ही भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून डेव्हलप करण्यात आली आहे. या कारने अडल्ट सेफ्टीमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग आणि चाईल्ड सेफ्टी विभागात चार स्टार रेटिंग मिळवले आहे. Mahindra XUV300 ला सात एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, EBD सह ABS, हीटेड ORVM, फ्रंट आणि रिअर पार्किंग कॅमेरे आहेत.
टाटा नेक्सॉन
Tata Nexon ला 5 स्टार NCAP रेटिंग मिळालं आहे. Tata Nexon मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेक असिस्ट आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखे पर्याय आहेत. यात एबीएस देखील आहे, जे कारची सुरक्षा आणखी वाढवतात.
Mahindra Marazzo
Mahindra Marazzo ला NCAP कडून 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. Mahindra Marazzo अधिक सुरक्षित बनवण्यात त्यातील विविध फीचर्सचा मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, डिस्क ब्रेक्स, EBD सह ABS, ISOFIX इत्यादी फीचर्स आहेत.
सुझुकी सुझुकी विटारा ब्रेझा
सुझुकी विटारा ब्रेझा ही 4 स्टार NCAP रेटिंग असलेली सुरक्षित भारतीय कार आहे. Suzuki Vitara Brezza मध्ये हाय-स्पीड वॉर्निंग अलर्ट, EBD सह ABS, ISOFIX माउंट, सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखे सेफ्टी फीचर्स आहेत.
फोक्सवॅगन पोलो
फोक्सवॅगन पोलोला NCAP रेटिंगमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. कारमध्ये असलेल्या उत्कृष्ट फीचर्समुळे अपघाताच्या वेळी कार सेफ्टी प्रदान करते. VW पोलो ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रेन सेन्सिंग वायपर, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक इत्यादीं फीचर्सनी सुसज्ज आहे.
इतर वाहनांचं सेफ्टी रेटिंग
- सुझुकी अर्टिगा : 3 स्टार सेफ्टी रेटिंग
- टाटा पंच : 5 स्टार सेफ्टी रेटिंग
- टाटा टिगॉर EV : 4 स्टार सेफ्टी रेटिंग
- रेनॉ ट्रायबर : 4 स्टार सेफ्टी रेटिंग
- महिंद्रा थार : 4 स्टार सेफ्टी रेटिंग
- मारुती सुझुकी एस-प्रेसो : या कारला 2020 मध्ये 0 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- Hyundai Grand i10 Nios : या कारला 2020 मध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- किआ सेल्टॉस : या कारला 2020 मध्ये 3 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- टाटा टिगॉर : या कारला 2020 मध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- टाटा अल्ट्रोज : या कारला 2020 मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- मारुती सुझुकी वॅगनआर : या गाडीला 2019 मध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- Hyundai Santro : या कारला 2019 मध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- Datsun redi-GO : या कारला 2019 मध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- Hyundai Santro : या कारला 2019 मध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
- Datsun redi-GO : या कारला 2019 मध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
इतर बातम्या
Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती
Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…
(Indian cars tested at Global NCAP 2021, check 21 famous cars safety report)