भारतात 14 जानेवारीपासून Kia Carens साठी बुकिंग सुरु, जाणून किंमत आणि फीचर्स

Kia Carens साठी भारतात 14 जानेवारीपासून बुकिंग सुरू होईल, तसेच या कारच्या किंमतीची घोषणा फेब्रुवारी-मार्चच्या आसपास होणे अपेक्षित आहे. Carens हे Kia चे भारतातील चौथे प्रोडक्ट असेल जे येथे देशांतर्गत विक्री आणि निर्यात दोन्हींसाठी उत्पादित केले जाईल.

भारतात 14 जानेवारीपासून Kia Carens साठी बुकिंग सुरु, जाणून किंमत आणि फीचर्स
Kia Carens
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 4:01 PM

मुंबई : Kia Carens साठी भारतात 14 जानेवारीपासून बुकिंग सुरू होईल, तसेच या कारच्या किंमतीची घोषणा फेब्रुवारी-मार्चच्या आसपास होणे अपेक्षित आहे. Carens हे Kia चे भारतातील चौथे प्रोडक्ट असेल जे येथे देशांतर्गत विक्री आणि निर्यात दोन्हींसाठी उत्पादित केले जाईल. Kia ने SUV ट्रेंडला मागे टाकले आहे, Carens सह कंपनीने एक युनिक अप्रोच स्वीकारत या कारला ‘रीक्रिएशनल व्हीकल’ म्हटले आहे. (Kia Carens bookings to start from 14 jauary)

कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये मोठा व्हीलबेस दिला आहे, जे मोठ्या ब्रेकरसहदेखील रायडर्ससाठी प्रवास आरामदायी बनवते. यासोबतच आत बसलेल्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध आहे. तसेच या कारमध्ये सिल्व्हर, ब्राऊन आणि ब्लू असे तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. साईड डोर्स क्रोम एडिशनमध्ये उपलब्ध आहेत. तसेच या कारमध्ये बाटल्या आणि इतर प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. एअर फ्रेशनर टांगण्यासाठी वेगळी जागा आहे.

Kia Carens ही कार डिसेंबरमध्ये जागतिक प्रीमियरद्वारे बाजारात दाखल झाली आहे आणि ही कार भारतात देखील उपलब्ध असेल. Kia Seltos, Kia Carnival आणि Kia Sonet नंतर Kia ची भारतातील ही चौथी कार आहे. या कारच्या मदतीने किआला भारतातल्या अशा घरांमध्ये प्रवेश करायचा आहे ज्यांचे कुटुंब मोठे आहे आणि त्यांना एसयूव्ही कार खरेदी करायची आहे.

Kia Carens भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये Hyundai Alcazar, Tata Safari आणि Mahindra XUV700 ला टक्कर देईल. या सर्व कार या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत आणि त्यांची किंमत 20 लाख रुपयांच्या आसपास आहेत. किया केरेन्सचे उत्पादन आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे केले जाईल.

शानदार डिझाईन

Kia Carens ला टायनर नोज ग्रिल मिळते, जे कंपनीच्या इतर कारमध्ये देखील आढळते. यामध्ये मोठे व्हील्स, क्रोम गार्निश, स्ट्रेट लाइन्स आणि एलईडी लाईट्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या Kia कारमध्ये 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग आहे. तसेच, बाजूच्या दरवाजांमध्ये क्रोम एडिशन आहे. या कारमध्ये बाटल्या आणि इतर प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. एअर फ्रेशनर टांगण्यासाठी वेगळी जागा आहे.

सीट्सच्या सेकेंड रो साठी टेक-बेस्ड डिव्हाईसेससाठी एक वेगळा ट्रे देखील उपलब्ध आहे, जो युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने, लोक लॅपटॉप आणि टॅब्लेटवर सहजपणे काम करू शकतात. Kia Carense मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय दिले आहेत, जे तीन ड्रायव्हर मोडसह येतात. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिकचे फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन आणि गियरबॉक्स डिटेल्स

Kia Carens मध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल युनिटचा पर्याय मिळेल. पहिले म्हणजे 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्कसह 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे फक्त 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह दिले जाईल. तर दुसरे 140hp पॉवर आणि 242Nm टॉर्कसह 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन जे 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. याशिवाय, डिझेल युनिट 115hp पॉवर आणि 250Nm मध्ये 1.5 लीटरचं असेल जे 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल. हे इंजिन गिअरबॉक्स कॉम्बीनेशन Kia Seltos वर ऑफर केलेल्या इंजिनासारखेच आहेत.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

(Kia Carens bookings to start from 14 jauary)

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.