latest electric car : कार ऑफ द इयर ठरलेल्या ‘या’ इलेक्ट्रिक कारची बुकींग 26 मेपासून होतेय सुरु

भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आता टाटा मोटर्स, एमजी कार्सशिवाय आता किआच्या कार्सही सहभागी होत आहे. कंपनी 26 मेपासून आपली ईव्ही कार बाजारात आणत आहे. या कारबाबत इतर माहिती जाणून घेणार आहोत.

latest electric car : कार ऑफ द इयर ठरलेल्या ‘या’ इलेक्ट्रिक कारची बुकींग 26 मेपासून होतेय सुरु
या अपकमिंग ईव्ही कारची बुकींग याच महिन्यात सुरु होत आहे.Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 1:22 PM

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक कार (Electric car) सेगमेंटचा गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला दिसून येत आहे. यात, टाटाचा दबदबा कायम आहे. यानंतर नंबर लागतो तो, एमजी झेडएस ईव्ही कारचा. आता या दोन्ही मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय बाजारात किआ (Kia) आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक कार घेउन येत आहे. या अपकमिंग ईव्ही कारची (EV car) बुकींग याच महिन्यात सुरु होत आहे. याबाबत स्वत: कंपनीकडून दुजोरा देण्यात आला आहे. युरोपियन कार ऑफ द इयरचा पुरस्कार मिळवणारी ही कार आता भारतात किती लोकप्रिय ठरणार, हे बघावे लागेल. दरम्यान, ही एक इंपोर्टेट मॉडेल असून सीबीयू रुटच्या माध्यमातून बाजारात दाखल होणार आहे.

100 युनिट्‍सची विक्री

किआ ईव्ही 6 ची भारतात काय किंमत असेल, याबाबत अधिकृत कुठलीही माहिती मिळालेली नाही. परंतु एवढे मात्र नक्की आहे, की सीबीयू रुटच्या माध्यमातून या कारवर बराच कर मोजावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना या कारच्या खरेदीसाठी जास्त रक्कम मोजावी लागू शकते. भारतात या कारला मर्यादीत स्वरुपातच आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. काही रिपोर्टनुसार, या कारच्या फक्त 100 युनिट्‌सचीच भारतात विक्री होणार आहे.

तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

आंतरराष्ट्रीय बाजारात किआ ईव्ही 6 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात, स्टँडर्ड रेंज, लाँग रेंज आणि जीटी व्हर्जनचा समावेश करण्यात आला आहे. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये ग्राहकांना 58 किलोव्हॅटची बॅटरी मिळेल ज्यात, 2 व्हील ड्राइव्ह कंफिग्रेशन असेल. ही कार 170 पीएस आणि 350 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करु शकणार आहे. 4 व्हील ड्राइव्ह कंफिग्रेशनमध्ये 235 पीएसची पावर आणि 605 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

77.4 किलोव्हॅटची बॅटरी

दरम्यान, लाँग रेंज व्हर्जनमध्ये 77.4 किलोव्हॅटची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात, 2 व्हील ड्राइव्ह कंफिग्रेशन आणि 4 व्हील ड्राइव्ह कंफिग्रेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच जीटी व्हर्जनमध्ये 77.4 किलोव्हॅटची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात, 585 पीएसची पावर आणि 740 एनएम पीट टॉर्क जनरेट केली जाउ शकते. ही फक्त 4 व्हील ड्राइव्ह पर्यायमध्ये उपलब्ध आहे. किआ ईव्ही 6 कारला भारतीय बाजारात टॉप व्हेरिएंटमध्ये सादर केले जाउ शकते. ज्याचे नाव जीटी ट्रिम असेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.