महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

तुम्ही जर महिंद्राची (Mahindra) पॉवरफुल SUV XUV500 घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला नवीन SUV वाहन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 3:38 PM

मुंबई : तुम्ही जर महिंद्राची (Mahindra) पॉवरफुल SUV XUV500 घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला नवीन SUV वाहन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आजकाल अनेक कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर जबरदस्त ऑफर देत आहेत. मग ते ह्युंडई असो, मारुती किंवा टाटा असो. मग महिंद्रा कंपनी यात मागे कशी पडेल? ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिंद्रा आता अशी बंपर ऑफर घेऊन आली आहे, ज्याबद्दल तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. (Mahindra xuv500 has discount upto 2 63 lakh rupees, check details)

महिंद्राची ही ऑफर त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक XUV500 वर उपलब्ध आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक्सयूव्ही 500 ची विशेष ओळख आहे. अशा परिस्थितीत, सर्वोत्तम ऑफर्स नक्कीच अधिक लोकांना ही कार खरेदी करण्यासाठी आकर्षित करतील. कंपनी या हिट SUV वर सूट देखील देत आहे कारण त्यांची नवीन कार XUV700 देखील बाजारात आली आहे.

काय आहे ऑफर

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर XUV500 वर 2.63 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट आहे. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहे. याचा अर्थ तुम्हाला नवी एसयूव्ही घेण्याची चांगली संधी आहे. XUV चार प्रकारांमध्ये येते, ज्यामध्ये W5, W7, W9 आणि W11 (O) चा समावेश आहे. यापैकी तीन व्हेरिएंटवर ऑफर्स आहेत, परंतु टॉप व्हेरियंट W11 (O) वर सर्वाधिक सवलत मिळत आहे. महिंद्रा या व्हेरिएंटवर 1.79 लाख रुपयांची रोख सवलत देत आहे. या व्यतिरिक्त, ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत आणि 13,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफरचे एक्सचेंज लाभ देखील मिळत आहेत. एवढेच नव्हे तर कंपनी 20 हजार रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज देखील देत आहे.

आता W7 आणि W9 बद्दल बोलूया, इथे तुम्हाला 2.11 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. ज्यामध्ये 1.28 लाख रुपयांपर्यंत रोख सवलत, 13,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत आणि 50 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. 20 हजार रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज देखील यात उपलब्ध असतील. तथापि, कारच्या W5 व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर नाही.

एक्सयूव्ही 500 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 14.22 लाख ते 18.84 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हे शक्तिशाली वाहन 155hp ची शक्ती देते, कारण त्याला 2.2-लीटर जबरदस्त डिझेल इंजिन मिळते. जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Mahindra xuv500 has discount upto 2 63 lakh rupees, check details)

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.