AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti च्या गाड्यांमध्ये दोष, तब्बल 1.81 लाख वाहने परत मागवली

एका निवेदनात मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) म्हटले आहे की, त्यांनी सियाज, एस क्रॉस, विटारा ब्रेझा, अर्टिगा आणि एक्सएल 6 चे पेट्रोल मॉडेल परत मागवले आहेत.

Maruti च्या गाड्यांमध्ये दोष, तब्बल 1.81 लाख वाहने परत मागवली
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 4:45 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) शुक्रवारी जाहीर केले की, कंपनीने आपल्या कार्सचे 1.81 लाख युनिट्स परत मागवले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, या वाहनांमध्ये काही समस्या आली आहे, जी सुरक्षेशी संबंधित आहे. यामुळे अनेक वाहने परत मागवण्यात आली आहेत. ज्या ग्राहकांचे वाहन परत मागवण्यात आले आहे अशा कार मालकांना त्यांचे वाहन मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमध्ये घेऊन जावे लागेल. (Maruti Suzuki to recall 1.8 lakh cars to inspect motor generators)

एका निवेदनात मारुती सुझुकीने म्हटले आहे की, त्यांनी सियाज, एस क्रॉस, विटारा ब्रेझा, अर्टिगा आणि एक्सएल 6 चे पेट्रोल मॉडेल परत मागवले आहेत. या वाहनांच्या निर्मितीची तारीख 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान असावी. जेव्हा या वाहनांना परत बोलावण्यात येईल, तेव्हा त्यांच्या मोटर जनरेटेड युनिट्सची तपासणी केली जाईल. वाहनामध्ये काही अडचण असल्यास, कंपनी ग्राहकांकडून कोणतेही पैसे न घेता त्याची दुरुस्ती करुन देईल.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाहनातील खराब झालेले भाग बदलले जातील. मारुती सुझुकीने येथील कार मालकांना विचारले आहे की, त्यांनी सध्या कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी वाहन घेऊन जाऊ नये किंवा वाहनाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागांवर पाणी फवारु नये.

ज्या ग्राहकांना त्यांचे वाहन या रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही हे तपासायचे आहे, ते मारुती सुझुकी आणि नेक्साच्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करू शकतात. येथे त्यांना वाहनाचा मॉडेल क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर त्यांचे वाहन या रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही याची माहिती त्यांच्यासमोर येईल.

चेसिस क्रमांक वाहनाच्या आयडी प्लेटवर आहे आणि वाहन चालान/नोंदणी कागदपत्रांमध्ये देखील नमूद आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी सप्टेंबरमध्ये उत्पादन घटण्याची अपेक्षा करत आहे, कारण सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीने मंगळवारी एक्सचेंज दाखल करताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये एकूण उत्पादन सामान्य उत्पादनाच्या सुमारे 40% असू शकते.

इतर बातम्या

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

(Maruti Suzuki to recall 1.8 lakh cars to inspect motor generators)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.