सेकेंड हँड कार मार्केटमध्ये मारुतीच्या ‘या’ SUV ला मोठी मागणी, पुरवठा करणं अवघड
सेकंड हँड कार मार्केटमध्ये विटारा ब्रेझाची मागणी इतकी जास्त आहे की, डीलर्स मागणी पूर्ण करू शकत नाहीत. (Maruti Suzuki Vitara Brezza SUV)
मुंबई : देशात कोरोना (Corona Pandemic) निर्माण झालेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे लोकांना स्वत:च्या वाहनाने प्रवास करावासा वाटतो आणि तेच जास्त सुरक्षितदेखील आहे. पण बजेटच्या समस्येमुळे लोक सेकंड हँड कारकडे वळले आहेत. हेच कारण आहे की, हल्ली सेकंड हँड कार मार्केटमध्ये वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासकरुन मार्केटमध्ये मारुतीची एसयूव्ही विटारा ब्रेझाला (Maruti Vitara Brezza) प्रचंड मागणी आहे. या कारला इतकी मागणी आहे की, डीलर्स पुरवठा करण्यात कमी पडत आहेत. (Maruti Suzuki Vitara Brezza SUV is in high demand in the second hand car market)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किरकोळ कॉस्मेटिक अपडेटसह लाँच झाल्यानंतर सहा वर्षानंतरही मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची क्रेझ कमी झालेली नाही. कमी किंमतीत अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना ही कार अधिक पसंत आहे सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात बेस्टसेलर असण्याव्यतिरिक्त मारुती सुझुकी विटारा ब्रेझा वापरलेल्या कार्सच्या मार्केटमध्येदेखील चांगली कामगिरी करत आहे.
मागणी अधिक, पुरवठा कमी
सेकंड हँड कार मार्केटमध्ये विटारा ब्रेझाची मागणी इतकी जास्त आहे की, डीलर्स मागणी पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना ब्रेझाच्या अनेक जुन्या युनिट विकत घेता आल्या नाहीत. मारुतीच्या गाड्यांची रीसेल व्हॅल्यू जास्त असल्यामुळे तर दुसऱ्या बाजूला खरेदीदारांनी हॅचबॅक कार्सच्या जागी एसयूव्हीला अघिक प्राधान्य दिल्याने Vitara Brezza ला मोठी मागणी आहे.
कमी देखभाल खर्चामुळे मागणी मोठी
मारूती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव कार एंड बाइडला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “युज्ड कार मार्केटमध्ये ब्रेझाला मोठी मागणी आहे, परंतु पुरवठा कमी आहे. योग्य दरात उपलब्ध झाल्यामुळे खरेदीदार सेकंड हँड कार मार्केटमधील Brezza कडे आकर्षित झाले आहेत. मारुती सुझुकी मोटारींना रीसेल व्हॅल्यू चांगली आहे. देशभरातील डीलर्सचं विशाल नेटवर्क आणि कमी देखभाल खर्चामुळे ब्रेझाला जास्त मागणी आहे.
सेंकड हँड गाड्यांच्या मागणीत विक्रमी वाढ,
गेल्या काही वर्षांत भारतात सेकंड हँड कार (Second Hand Car) विक्रीत मोठी वाढ झाली आहे. स्टेटिस्टाने काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या एका अहवालात म्हटल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील कार बाजाराचे आकारमान 4.4 मिलियन (दशलक्ष – 10 लाख) युनिटपेक्षा जास्त होते, जे त्या काळात नवीन कार मार्केटच्या आकारापेक्षा जास्त होते. भारतातील सेकंड-हँड कार विक्रीची 2019 मधील याच महिन्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये भारतातील सेकंड-हँड कार विक्रीत जवळपास 50% वाढ झाली आहे
इंडियन ब्लू बुकने केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार, आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील सेकंड हँड कार मार्केट 4.2 मिलियन युनिट इतकं मोठं होतं. त्याच वेळी असा दावा केला गेला आहे की, त्याच आर्थिक वर्षात कार विक्रीत 5% YoY वाढ झाली आहे, तर कोरोना महामारीच्या आर्थिक संकटामुळे नवीन कार विक्रीत 17.8% घट झाली आहे. नवीन कारच्या 2.8 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीपेक्षा सेकंड-हँड कारची विक्री 50% जास्त आहे.
इतर बातम्या
Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश
धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार
Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
(Maruti Suzuki Vitara Brezza SUV is in high demand in the second hand car market)