अमिताभ बच्चन आणि युवराज सिंहनंतर MG Motor कडून NFT ची घोषणा, ठरली पहिलीच कारउत्पादक कंपनी
एमजी मोटर इंडियाने नॉन-फंगिबल टोकन (NFT) मधील प्रवेशाची घोषणा केली आहे. यासह ब्रिटीश ब्रॅण्ड एनएफटीचे कलेक्शन लाँच करणारा भारतातील पहिला कारमेकर बनला आहे.
मुंबई : एमजी मोटर इंडियाने नॉन-फंगिबल टोकन (NFT) मधील प्रवेशाची घोषणा केली आहे. यासह ब्रिटीश ब्रॅण्ड एनएफटीचे कलेक्शन लाँच करणारा भारतातील पहिला कारमेकर बनला आहे. लाँच कलेक्शनचा भाग म्हणून 1111 युनिट्स डिजिटल क्रिएटिव्ह्जसोबत एमजी एनएफटी कलेक्शनच्या विक्रीला 28 डिसेंबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरूवात होईल. ऑटोमेकर विशेषत: एमजी व्यवहारांसाठी सानुकूल करण्यात आलेल्या कॉईनअर्थच्या एनगेजएन व्यासपीठावर पदार्पणीय एनएफटी सादर करेल. (MG Motor India introduces collection of NFTs in India)
कंपनीच्या स्थापनेपासून एमजी मोटरने चार मुलभूत आधारस्तंभांवर (वैविध्य, अनुभव, समुदाय व नवोन्मेष्कारी) भर दिला आहे. आपल्या विश्वासाला अधिक दृढ करत एमजीचे एनएफटी 4 सी(C)” विभागांमध्ये विभागण्यात येईल: कलेक्टेबल्स, कम्युनिटी अॅण्ड डायव्हर्सिटी, कोलॅबोरेटिव्ह आर्ट आणि सीएएपी (कार-अॅज-ए-प्लॅटफॉर्म).
एमजी मोटर इंडियाचे गौरव गुप्ता म्हणाले, “ऑटो-टेक ब्रॅण्ड म्हणून एमजीने नेहमीच नवोन्मेष्काराला प्राधान्य दिले आहे. या नवीन उपक्रमासह आम्ही एनएफटीचे सामाजिकीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहोत. या परिवर्तनासह एमजी मालक, चाहते, एमजीसीसी सदस्य आणि व्यापक समुदाय एकत्र येऊन अनेक प्रकारांमधील बहुमूल्य डिजिटल क्रिएटिव्ह्जना साजरे करण्यासाठी स्वत:च्या मालकीचे बनवतील. आम्ही एनएफटीमधील आमच्या प्रवेशासाठी कॉईनअर्थसोबतच्या आमच्या विद्यमान संबंधाला अधिक दृढ करत आहोत. या पहिल्याच विक्रीमधून मिळणारे उत्पन्न एमजी सेवा अंतर्गत सामुदायिक सेवांसाठी वापरण्यात येईल.”
कॉईनअर्थचे संस्थापक प्रफुल चंद्रा म्हणाले, “एमजी मोटरसोबत त्यांच्या एनएफटीमधील पदार्पणामध्ये आमचा सहयोग आमच्यासाठी उत्साहवर्धक क्षण आहे. कॉईनअर्थमध्ये आम्ही विश्वसनीय एनएफटीच्या माध्यमातून सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड्ससाठी अविरत वारसा निर्माण करण्याशी कटिबद्ध आहोत. एमजीसोबतचे आमचे कलेक्शन रूपयांमध्ये असण्यासोबत जीएसटीसह प्रमाणित असतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रमाणीकरणाचे अद्वितीय प्रमाणपत्र देण्यात येईल. आम्ही ब्रॅण्डसोबत लाभदायी सहयोगासाठी, तसेच एनएफटी गतीला अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहोत.एनएफटी भावी सहयोगात्मक तंत्रज्ञानासाठी खरे गुरूकिल्ली असतील.”
अनेक सेलेब्सकडून NFT लाँच
डिजिटल अर्थजगतात नॉन फंगीबल टोकनची (NFT) सर्वत्र चर्चा आहे. नामांकित अभिनेत्यांनी आतापर्यंत नॉन फंगीबल टोकन स्विकारण्याची घोषणा केली आहे. भारतात बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर, माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी NFTs लाँच केले आहेत. माजी क्रिकेटपटू गावस्कर यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांचे NFT कलेक्शन लाँच केले होते, ज्यात त्यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक क्षणांचा समावेश होता.
बिटकॉईनपाठोपाठ नॉन-फंगीबल टोकन डिजिटल अर्थव्यवहारांत ट्रेंडिंगचा विषय बनले आहेत. त्यामुळे नामांकित अभिनेते, सुप्रसिद्ध खेळाडूनंतर उद्योगजगताचे लक्ष ‘एनएफटी’कडे वेधले गेले आहे. विख्यात एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने स्वत:चे नॉन-फंगीबल टोकन (NFT) लाँच करण्याची घोषणा केली आहे.
‘एनएफटी’ म्हणजे काय रं भाऊ?
आभासी जगतामध्ये ‘एनएफटी’हे डिजिटल ऑब्जेक्ट म्हणून गणले जाते. यामध्ये वस्तू, संगीत, छायाचित्रे, व्हिडिओ यापैकी कशाचाही समावेश असू शकतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘एनएफटी’ला अधिकृततेचं प्रमाणपत्र बहाल केलं जातं. डिजिटल स्वरुपात ‘एनएफटी’ची देवाणघेवाण केली जाते. ‘एनएफटी’च्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या स्वरुपाच्या आर्थिक उलाढालीला देखील चालना मिळते. आभासी स्वरुपाच्या वस्तूंवर कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली सध्या ‘एनएफटी’च्या वर्तृळात घडत आहेत.
इतर बातम्या
Zoomcar : तुमच्याकडे कार आहे का? महिन्याला कमवा 20 ते 30 हजार; कसे ते वाचा…
टाटा मोटर्सची ईयर-एंड ऑफर, Tiago ते Safari पर्यंतच्या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट
. (MG Motor India introduces collection of NFTs in India)