एमजी मोटर्स आणणार दोन सीटर इलेक्ट्रिक कार, बजेट आणि लूकमध्येही ‘पास’

E230 नावाच्या या इलेक्ट्रिक कारला कंपनी ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हीकलअंतर्गत तयार करीत आहे. ही कार आधीच विविध बॉडी स्टाइलमध्ये उतरवण्यात आलेली आहे.

एमजी मोटर्स आणणार दोन सीटर इलेक्ट्रिक कार, बजेट आणि लूकमध्येही ‘पास’
‘एमजी’ कारच्या विक्रीत घट... जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 10 टक्क्यांनी घसरगुंडी...Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 7:50 PM

एमजी मोटर (MG Motor) भारतीय बाजारामध्ये एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार (electric car) आणण्याच्या तयारीमध्ये आहे. एमजी मोटर्स ही तयारी आपला को-ब्रँड Wuling’s Air EV च्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. खरेतर Wuling’s Air EVने एका इव्हेंटमध्ये इंडोनेशियामध्ये आपली इलेक्ट्रिक कारला लाँच केले आहे. ई230 (E230) नावाच्या या इलेक्ट्रिक कारला कंपनी ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हीकलअंतर्गत तयार करीत आहे. ही कार आधीच विविध बॉडी स्टाइलमध्ये उतरवण्यात आलेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लवकरच ही कार भारतील बाजारातदेखील उतरविण्यात येणार आहे.

GSEV अंतर्गत तयार होणार्या जवळपास सर्व कार सारख्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात येत असतात. यात दोन डोर बॉडी स्टाइल असलेल्या कार्सचा समावेश करण्यात आला आहे. एमजी मोटर्स भारतासाठी देखील 2 सीटर इलेक्ट्रिक कार बाजारात आणेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कंपनी यात काही बदल करणे अपेक्षीत आहे. भारतीय रस्ते, वर्दळ बघता यात कस्टमायझेशनची सुविधा देण्याचाही कंपनीचा विचार आहे.

अल्टोपेक्षा डिझाईनमध्ये लहान

जर एमजीच्या या कारची तुलना भारतात सर्वाधिक विक्री होणार्या अल्टोसोबत केली तर ती अल्टोपेक्षाही लहान असणार आहे. अल्टोच्या तुलनेत ही कार 400 एमएम लहान असणार आहे. भारतातील वर्दळ, पार्किेंगची चणचण बघता एमजी कंपनीकडून चांगली कॉम्पॅक्ट ईव्हीचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या कारमध्ये 25kWh ची क्षमता असलेली बॅटरी पॅक लावण्यात आले आहे. एक वेळा पूर्ण चार्जिंग केल्यावर ही कार 150 किमीपर्यंत रेंज मिळवते.

हे सुद्धा वाचा

केव्हा होईल भारतात लाँच

एमजी मोटर्सने या कारला सध्या इंडोनेशियामध्ये लाँच केले आहे. भारतात ही कार केव्हा लाँच होईल याबाबत अद्याप कंपनीकडून पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या कारला भारतासारख्या देशात चांगले फ्यूचर असल्याचा विश्‍वास एमजी इंडिया कंपनीकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.