Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने भारतात सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी Innova Crysta MPV चं नवीन लिमिटेड एडिशन सादर केलं आहे. नवीन लिमिटेड एडिशन इनोव्हा क्रिस्टा जीएक्स ट्रिम लेव्हलवर आधारित आहे.

Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स
Toyota Innova Crysta
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:58 PM

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने भारतात सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी Innova Crysta MPV चं नवीन लिमिटेड एडिशन सादर केलं आहे. नवीन लिमिटेड एडिशन इनोव्हा क्रिस्टा जीएक्स ट्रिम लेव्हलवर आधारित आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या लिमिटेड एडिशनसह इंजिन पर्याय आणि ट्रान्समिशन पर्याय दोन्ही उपलब्ध आहेत. (New Toyota Innova Crysta limited edition launched with new features)

TKM च्या सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग विभागाचे असोसिएट जनरल मॅनेजर (AGM) V. Visselin Sigmani म्हणाले की, “इनोव्हा MPV सेगमेंट मध्ये लॉन्च झाल्यापासून या सेगमेंटमध्ये अग्रेसर आहे, ज्यामुळे ती आमच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक बनली आहे. आम्ही इनोव्हा क्रिस्टाचे 100 हून अधिक उत्कृष्ट फीचर्स एकत्र आणण्यासाठी एक कॅम्पेन स्कीम आणली आहे, जी टोयोटाची क्वालिटी, स्टेबिलिटी आणि विश्वासासह टेक्नोलॉजी, लग्झरी, आराम, गुणवत्ता या विभागात लीड करते.

टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा लिमिटेड एडिशनमध्ये अनेक नवीन फिचर्सची भर घातली आहे. जीएक्स ट्रिमसह उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, लिमिटेड एडिशन व्हेरिएंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले युनिट (एचयूडी), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस), यात वायरलेस फोनसह सुसज्ज अतिरिक्त मल्टी-टेरेन मॉनिटर मिळतो. डॅशबोर्डला एक इंटिग्रेटेड चार्जिंग सिस्टिम, 16 रंग पर्यायांसह नवीन एम्बियंट लायटिंग सिस्टीम आणि एअर आयनाइजर मिळते.

GX ट्रिम आधीपासूनच Android Auto आणि Apple Carplay कनेक्टिविटीसोबत 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसारख्या सुविधा ऑफर करते. यात इलेक्ट्रिकली फोल्डिंग ORVMs, टिल्ट आणि टेलिस्कोपिकली अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, ABS, हिल स्टार्ट असिस्ट, व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रोल, एअर आयनाइजर आणि बरेच फीचर्स मिळतात.

Toyota ची शानदार SUV सज्ज

टोयोटा (Toyota) कंपनी लवकरच एक शानदार SUV लाँच करण्याची तयारी करत आहे. ही एसयूव्ही आणण्यामागचे कारण असेही आहे की, अलीकडच्या काळात या सेगमेंटमधील लोकांची क्रेझ खूप वाढली आहे आणि या दृष्टीने टोयोटा ही नवीन एसयूव्ही देखील आणत आहे. या वाहनाला टोयोटा फ्रंटलँडर (Toyota Frontlander) असे नाव देण्यात आले आहे. ही कार नुकतेच अनावरण केलेल्या कोरोला क्रॉस एसयूव्हीचे वेगळे व्हर्जन असल्याचे दिसते.

कोरोला क्रॉस एसयूव्ही आधीच परदेशात विकली जात आहे. भारतात लॉन्च होण्यापूर्वी ती चीनमध्ये लॉन्च केली जाईल. फ्रंटलँडरमधील जवळजवळ प्रत्येक फीचर कोरोला क्रॉस सारखेच दिसते. फ्रंटलँडरचे साइड प्रोफाइल कोरोला क्रॉससारखेच दिसते. पण कारचे हेड लॅम्प, फ्रंट ग्रिल आणि बंपर थोडे वेगळे आहे. याशिवाय मागील बंपरमध्येही थोडा फरक आहे. या कारच्या ग्लोबल लॉन्चपूर्वी कंपनीने त्याची झलक सादर केली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(New Toyota Innova Crysta limited edition launched with new features)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.