Nissan Magnite चा भारतीय बाजारात धुमाकूळ, 60,000 बुकिंग्सचा टप्पा पार

जपानी कार उत्पादक कंपनी निसानच्या मॅग्नाईट या कारने भारतात आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीला आतापर्यंत 60,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत.

Nissan Magnite चा भारतीय बाजारात धुमाकूळ, 60,000 बुकिंग्सचा टप्पा पार
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 5:01 PM

मुंबई : जपानी कार उत्पादक कंपनी निसानच्या मॅग्नाईट या कारने भारतात आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीला आतापर्यंत 60,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वाहन लाँच झाल्यापासूनची आहे. ऑगस्ट महिन्यातही मॅग्नाईटने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि येथे कंपनीने एकूण 3 हजार 209 युनिट्सची विक्री केली आहे. (Nissan Magnite surpasses 60,000 mark in bookings in india)

निसान मॅग्नाइट लाँच केली तेव्हा या वाहनाने इतर अनेक कंपन्यांशी स्पर्धा केली. पण मॅग्नाइटने सगळ्यांना मागे टाकत भारतीय बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिणामी या वाहनाची विक्रमी विक्री होत आहे. ही कार सीव्हीटी गिअरबॉक्ससह येते. त्याची सुरुवातीची किंमत 5.5 लाख रुपये इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेस व्हेरिएंट मिळेल.

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

  • Magnite XE – 5.59 लाख रुपये
  • Magnite XL – 6.32 लाख रुपये
  • Magnite XV – 6.99 लाख रुपये
  • Magnite XV Premium – 7.68 लाख रुपये
  • Magnite Turbo XL – 7.49 लाख रुपये
  • Magnite Turbo XV – 8.09 लाख रुपये
  • Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये
  • Magnite Turbo XL CVT – 8.39 लाख रुपये
  • Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये
  • Magnite Turbo XV Premium CVT – 9.74 लाख रुपये

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

  • Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.
  • LED DRL, LED इंडिकेटर
  • 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स
  • व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

(Nissan Magnite surpasses 60,000 mark in bookings in india)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.