Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola S1 Pro : 200 किमीची रेंज मिळावा अन् फ्रीमध्ये ओला स्कूटर जिंका… जाणून घ्या संपूर्ण माहिती

ओला इलेक्ट्रिक आपल्या ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर एक चांगली ऑफर आणत आहे.

Ola S1 Pro : 200 किमीची रेंज मिळावा अन् फ्रीमध्ये ओला स्कूटर जिंका... जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ola S1 ProImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:11 PM

मुंबई : वाढत्या पेट्रोलच्या किंमती बघता देशात इलेक्ट्रिक टू-व्हिलरची चांगलीच मागणी वाढलेली दिसून येत आहे. दिग्गज ऑटो कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आपल्या ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर एक चांगली ऑफर (offer) आणत आहे. जर तुम्ही एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. ओला इलेक्ट्रिक फ्रीमध्ये आपली ओला एस1 प्रो (Ola S1 Pro) इलेक्ट्रिक स्कूटर देत आहे. ही ऑफर केवळ त्याच ग्राहकांसाठी आहे, जे एक वेळ चार्ज केल्यावर 200 किमीपर्यंतची रेंज मिळवू शकणार आहेत. कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ असलेले भाविश अग्रवाल यांनी एक ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. या ऑफरअंतर्गत फ्री स्कूटरची डिलिव्हरी जून 2022 मध्ये तमिळनाडूतील कंपनीच्या फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये दिली जाणार आहे. कंपनी या ऑफरच्या माध्यमातून सेल आणि युजर बेसला वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.

होळीच्या सणाच्या मुहूर्तावर लाँच

ओलाने आपल्या एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला गेरुआ संस्करण होळीच्या सणाच्या मुहूर्तावर लाँच करण्याची योजना आखली आहे. सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत ट्वीट केले आहे, की ‘उत्साह पाहता आम्ही आणखी 10 ग्राहकांना मोफत गेरुआ स्कूटर देणार आहोत, जे ग्राहक एक वेळा चार्ज केल्यावर 200 किमीचे अंतर पार करतील अशांना मोफत स्कूटर देण्यात येणार आहे. आमच्या जवळ दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांनी हे अंतर पार केले आहे. फ्री स्कूटरची डिलिव्हरी जून 2022 मध्ये तामिळनाडूतील कंपनीच्या फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्कूटरचे गेरुआ व्हर्जन लाँच

होळीच्या सिजनमध्ये ओलाने आपल्या एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचे गेरुआ व्हर्जन लाँच केले आहे. देशात मागील काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेंगलुरुत असलेली एक कंपनी युजर्सचा विश्‍वास संपादन करण्यासाठी पुन्हा एकदा विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे.

अनेक शंकांचे होणार निरसन

विविध राज्यांमधून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना वेगाने समोर येत आहे. अशाने इलेक्ट्रिक स्कूटरबाबत ग्राहकांच्या मनातदेखील अनेक शंका निर्माण होताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करण्याला घाबरत आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी शासनाकडूनही एक टीम तयार करण्यात आली आहे. ओलाने आपल्या कम्यूनिटीमध्ये युजर्सचे प्रबोधन आणि इलेक्ट्रिक स्कूटरला चालना देण्यासाठी विविध ठिकाणी इव्हेंट घेण्याला सुरुवात केली आहे.

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.