Ola इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीत ‘महिला राज’, स्त्रियाच चालवणार कारखाना, 10,000 जणींची भरती होणार

ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे महिला सर्व काम सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद. जर नसेल पाहिला तर त्यासाठी सज्ज व्हा.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीत 'महिला राज', स्त्रियाच चालवणार कारखाना, 10,000 जणींची भरती होणार
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 5:50 PM

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे महिला सर्व काम सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद. जर नसेल पाहिला तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण ओला (OLa) आपला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे. ओलाचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 10,000 हून अधिक महिलांना रोजगार दिला जाईल. (Ola electric scooter facility to be largest all-women factory in the world with 10000 Woman employee)

अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की ओला फ्यूचरफॅक्टरीचे संपूर्ण संचालन महिला करतील. ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला काम करतील. केवळ महिला कामगार असणारा हा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.” अग्रवाल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांची पहिली तुकडी दाखवण्यात आली आहे.

OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

जगातील सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची Ola कंपनीची योजना आहे. हे चार्जिंग नेटवर्क ओला हायपरचार्जर नेटवर्क (Ola Hypercharger Network) म्हणून ओळखले जाईल आणि जगातील सर्वात रुंद आणि सर्वात दाट इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क असेल. ओला भारताच्या 400 शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवण्याची योजना आखत आहे. ओलाने चारचाकी इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा केला नसला तरी, ते आपल्या वाहनांना चालना देण्यासाठी त्याच चार्जिंग नेटवर्कचा वापर करू शकते.

ओलाने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, ते आपल्या कारखान्याचा पहिला टप्पा उभारण्यासाठी एकूण 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. नवीन कारखाना फ्युचरफॅक्टरी म्हणून ओळखला जाईल आणि तामिळनाडूमध्ये 500 एकर जागेवर बांधला जाईल. या कारखान्याची वार्षिक 10 मिलियन वाहनं तयार करण्याची क्षमता असेल. नवीन कारखाना जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असेल, ज्याची क्षमता जगातील एकूण उत्पादनाच्या 15% इतकी असेल.

OLA इलेक्ट्रिक कार लाँच करणार?

ओला इलेक्ट्रिक कंपनीने नवीन एस 1 आणि एस 1 प्रो स्कूटरसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात पदार्पण केले आहे. भारतीय कंपनी आता इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी संकेत दिले आहेत की, ते इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. ओला कंपनी 2023 पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते, असे भाविश यांचे म्हणणे आहे.

भावीश अग्रवाल म्हणाले होते की, भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक असतील. भविष्यात भारताला इलेक्ट्रिक व्हेईकल हबमध्ये बदलण्यासाठी उत्पादकांनी लाभ घेणे आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तथापि, सीईओने इलेक्ट्रिक चारचाकी बाजारात प्रवेश करण्याच्या त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणताही तपशील शेअर केला नाही. तुम्हाला माहित असले पाहिजे की, ओला भारतात आधीच इलेक्ट्रिक कारचा ताफा चालवते. ओलाने भारतातील विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहने चालवायला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळी त्यांची वाहनं चार्ज करण्यासाठी हब तयार केले आहे.

15 ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर S1 ही 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केली. ओला ऑक्टोबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल आणि या स्कूटरची किंमत राज्यांवर अवलंबून, राज्य सहाय्यकांनुसार ऑन-रोड किंमत कमी असू शकते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाविश अग्रवाल म्हणाले की, तामिळनाडूमध्ये कृष्णागिरी प्लांट विकसित करण्याची आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे केंद्र बनवण्याची त्यांची योजना आहे. ओला एक उपकंपनी किंवा सप्लायर पार्क देखील तयार करेल, जे या परिसरात दुकानदारांना दुकानं उभारण्यास सक्षम करेल, जेणेकरून इतर खरेदीदार देखील थेट खरेदी करू शकतील.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Ola electric scooter facility to be largest all-women factory in the world with 10000 Woman employee)

Non Stop LIVE Update
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.