AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार

ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी (Electric Scooter) प्री-बुकिंग सुरू केल्यापासून 24 तासांपेक्षा कमी वेळात या स्कूटरसाठी 1 लाख बुकिंग्स मिळाल्या आहेत.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार
OLA Electric Scooter
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 3:42 PM
Share

मुंबई : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) त्यांच्या पहिल्याच इलेक्ट्रिक स्कूटरसाठी (Electric Scooter) प्री-बुकिंग सुरू केल्यापासून 24 तासांपेक्षा कमी वेळात या स्कूटरसाठी 1 लाख बुकिंग्स मिळाल्या आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून 499 रुपयांमध्ये स्कूटर बुक करू शकतात. बुकिंगची रक्कम पूर्णपणे परताव्यायोग्य (रिटर्नेबल) आहे. बुकिंग सुरु झाल्यामुळे, अला अंदाज लावला जातोय की, येत्या आठवड्यात स्कूटर लाँच होऊ शकते, किंवा महिनाअखेपर्यंत स्कूटर लाँच होईल. (Ola electric scooter gets over 1 lakh pre bookings in just 24 hours)

आश्चर्याची बाब म्हणजे जानेवारी ते जून 2021 या काळात भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची एकूण विक्री 30,000 युनिट्स इतकी आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला प्रचंड मागणी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ओलाचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, “आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाबद्दल भारतभरातील ग्राहकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला आनंद देणारा आहे. इतकी प्रचंड मागणी म्हणजे ग्राहकांची पसंती ईव्हीला आहे, तसेच ग्राहक आता ईव्हीकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ओला स्कूटर बुक करुन आणि ईव्ही क्रांतीमध्ये सामील झालेल्या सर्व ग्राहकांचे मी आभार मानतो. ही फक्त सुरुवात आहे!

ज्या ग्राहकांनी आता ओला इलेक्ट्रिक स्कूटर आरक्षित (रिझर्व्ह) केली आहे त्यांना स्कूटरची डिलिव्हरी सुरु झाल्यावर प्राधान्य मिळेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 100-150 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि त्यात रिमूव्हेबल लिथियम-आयन बॅटरी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्लाऊड कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक सस्पेंशन अप फ्रंट आणि इतर बरेच फीचर्स मिळतील.

यापूर्वी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, स्कूटर मोठ्या अंडरसीट स्टोवेज, चांगलं एक्सीलरेशन आणि सेगमेंट-लीडिंग रेंज दाखवण्यात आली आहे. अर्थात, टेक्निकल एक्सपर्टीजबद्दल नेमके तपशील अद्याप जाहीर केले गेले नाहीत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन तमिळनाडूमधील ओला इलेक्ट्रिकच्या प्लांटमध्ये केले जात आहे. हा प्लांट इंडस्ट्रीच्या 4.0 स्टँडर्ड्सना पूर्ण करतो.

फक्त 499 रुपयांत बुक करा स्कूटर

अलिकडेच ओलाचे प्रमुख भाविश अग्रवाल यांनी ओलाच्या आगामी स्कूटरची काही वैशिष्ट्यांचा खुलासा केला होता. कंपनीच्या ग्रुप सीईओने नुकतीच ट्विटरवर जाहीर केले की, स्कूटरमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस, अ‍ॅप-आधारीत कीलेस एक्सेस आणि सेगमेंट-लीडिंग रेंज यासारख्या सुविधा असतील. स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपये खर्च करावे लागतील.

केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ड होणार

मागील दाव्यांनुसार, ओलाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचे सांगितले जाते. या दाव्यांना कोणताही आधार असल्यास स्कूटर अ‍ॅथर 450X आणि TVS iQube सह त्याच्या बर्‍याच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक रेंजला सपोर्ट करेल.

चालू महिन्याच्या अखेरीस विक्री होण्याची शक्यता

या व्यतिरिक्त स्कूटरच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये फुल-एलईडी लायटिंग, वेगवान चार्जिंग क्षमता, फ्रंट डिस्क ब्रेक आणि बरेच काही समाविष्ट असेल. पुढील काही दिवसात स्कूटरबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. चालू महिन्याच्या अखेरीस याची भारतात विक्री होण्याची शक्यता आहे. त्याची किंमत 1 लाख ते 1.2 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत 15 टक्के स्कूटर करण्याचे लक्ष्य

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15 टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून या स्कूटरची निर्यातही कंपनीला करायची आहे. मे 2010 मध्ये 96 टक्के घट झाल्यामुळे ओला 1,400 कर्मचारी सोडत होते, तर ओला इलेक्ट्रिकने एम्स्टर्डममधील इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी एटरगो बीव्हीला स्कूटरची लाइन लाँच करण्यासाठी विकत घेतले होते.

2017 मध्ये झाली ओला इलेक्ट्रिकची स्थापना

ओला इलेक्ट्रिकची स्थापना 2017 मध्ये झाली आणि 2019 मध्ये कंपनीने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला, जो सर्वात वेगवान भारतीय युनिकॉर्न बनला. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, सॉफ्टबँक, टाटा सन्स, मॅट्रिक्स पार्टनर्स, ह्युंडाई मोटर आणि याची सहाय्यक कंपनी किया मोटर्स या कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे 307 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. युनिकॉर्न ही एक खासगी कंपनी आहे ज्याची किंमत 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

इतर बातम्या

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

(Ola electric scooter gets over 1 lakh pre bookings in just 24 hours)

कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.