320 किमी रेंज असलेल्या OLA ने ‘या’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लाँच, जाणून घ्या किंमत
ओलाने जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या स्कूटर्सची नवीन मॉडेल्स लाँच केले आहे, या रेंजमध्ये एस 1 प्रो, एस 1 प्रो प्लस, एस 1 एक्स आणि एस 1 एक्स प्लस स्कूटरचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्कूटर्सची किंमत किती आहे आणि त्या फुल चार्जवर किती किलोमीटर धावू शकतात.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेकजण आता पेट्रोलच्या गाड्या न घेता इलेक्ट्रिक स्कुटर्स घेण्याकडे जास्त वळताना दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत आता ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी नवीन जेन ३ इलेक्ट्रिक स्कूटर्सचे मॉडेल्स लाँच केले आहे. जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या नवीन स्कूटरच्या या मॉडेल्समध्ये ओला एस 1 प्रो, ओला एस 1 प्रो प्लस, ओला एस 1 एक्स आणि ओला एस 1 एक्स प्लस चा समावेश आहे. या सर्व नवीन ओला स्कूटर्स कंपनीच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम मूव्हओएस 5 वर चालणाऱ्या आहेत . पूर्वी स्कूटरमध्ये हब मोटर्सचा वापर केला जात होता, परंतु आता कंपनीने नवीन ओला स्कूटरमध्ये मिड-ड्राइव्ह मोटर्स आणि इंटिग्रेटेड मोटर कंट्रोल युनिट्स चा वापर केला आहे.
वैशिष्ट्ये आणि ड्रायव्हिंग रेंज
जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या या नवीन मॉडेल्ससाठी ओलाने ब्रेक-बाय-वायर टेक्नॉलॉजीचे पेटंट घेतले आहे. तसेच या स्कुटरचे नवीन सिस्टीम ब्रेक लिव्हरवर सेन्सरचा वापर करून ब्रेक पॅड वेअर आणि मोटर रेझिस्टन्स संतुलित करण्यासाठी कार्य करते, परिणामी या स्कुटरच्या रेंजमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
सर्व जनरेशन 3 च्या या नवीन स्कूटर्समध्ये सुरक्षेसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली असून यासोबतच या लेटेस्ट मॉडेल्सची किंमत मागील मॉडेल्सच्या तुलनेत 31 टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय पीक पॉवरमध्ये ५३ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा दावा आहे की, प्रो प्लस व्हेरियंटची टॉप स्पीड 141 किमी प्रति तास आहे आणि या स्कूटर्स फुल चार्जवर 320 किलोमीटरपर्यंत रेंज देतील.
ओला एस १ एक्स जेन ३ मॉडेल्सची किंमत
Ola S1X 2kWh या व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये इतकी आहे. तर 3kWh व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आणि 4kWhच्या टॉप मॉडेलची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. Ola S1X Plus च्या 4kWh व्हेरियंटची किंमत 1,07,999 रुपये आहे. या सर्व किंमती कंपनीच्या एक्स-शोरूमच्या किंमती आहेत.
ओला एस१ प्रो जेन ३ मॉडेल्सची किंमत
ओलाच्या या स्कूटरच्या 3kWh व्हेरियंटची किंमत 1,14,999 रुपये आहे. तर 4kWh व्हेरिएंटची किंमत 1,34,999 रुपये इतकी आहे. Ola S1 Pro Plus व्हेरिएंटच्या 4kWhची किंमत 1,54,999 रुपये आणि 5.5kWh व्हेरिएंटची किंमत 1,69,999 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत.