देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

जगातील सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची ओला (OLA) कंपनीची योजना आहे. हे चार्जिंग नेटवर्क ओला हायपरचार्जर नेटवर्क (Ola Hypercharger Network) म्हणून ओळखले जाईल.

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:21 AM

मुंबई : ओला (OLA) कंपनीने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची कंपनीची योजना आहे. हे चार्जिंग नेटवर्क ओला हायपरचार्जर नेटवर्क (Ola Hypercharger Network) म्हणून ओळखले जाईल आणि जगातील सर्वात रुंद आणि सर्वात दाट इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क असेल. ओला भारताच्या 400 शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवण्याची योजना आखत आहे. ओलाने चारचाकी इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा केला नसला तरी, ते आपल्या वाहनांना चालना देण्यासाठी त्याच चार्जिंग नेटवर्कचा वापर करू शकते. (OLA will launch 1 lakh electric charging points in 400 cities across India)

ओलाने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, ते आपल्या कारखान्याचा पहिला टप्पा उभारण्यासाठी एकूण 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. नवीन कारखाना फ्युचरफॅक्टरी म्हणून ओळखला जाईल आणि तामिळनाडूमध्ये 500 एकर जागेवर बांधला जाईल. या कारखान्याची वार्षिक 10 मिलियन वाहनं तयार करण्याची क्षमता असेल. नवीन कारखाना जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असेल, ज्याची क्षमता जगातील एकूण उत्पादनाच्या 15% इतकी असेल.

OLA इलेक्ट्रिक कार लाँच करणार?

ओला इलेक्ट्रिक कंपनीने नवीन एस 1 आणि एस 1 प्रो स्कूटरसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात पदार्पण केले आहे. भारतीय कंपनी आता इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी संकेत दिले आहेत की, ते इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. ओला कंपनी 2023 पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते, असे भाविश यांचे म्हणणे आहे.

भावीश अग्रवाल म्हणाले होते की, भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक असतील. भविष्यात भारताला इलेक्ट्रिक व्हेईकल हबमध्ये बदलण्यासाठी उत्पादकांनी लाभ घेणे आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तथापि, सीईओने इलेक्ट्रिक चारचाकी बाजारात प्रवेश करण्याच्या त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणताही तपशील शेअर केला नाही. तुम्हाला माहित असले पाहिजे की, ओला भारतात आधीच इलेक्ट्रिक कारचा ताफा चालवते. ओलाने भारतातील विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहने चालवायला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळी त्यांची वाहनं चार्ज करण्यासाठी हब तयार केले आहे.

15 ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर S1 ही 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केली. ओला ऑक्टोबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल आणि या स्कूटरची किंमत राज्यांवर अवलंबून, राज्य सहाय्यकांनुसार ऑन-रोड किंमत कमी असू शकते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाविश अग्रवाल म्हणाले की, तामिळनाडूमध्ये कृष्णागिरी प्लांट विकसित करण्याची आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे केंद्र बनवण्याची त्यांची योजना आहे. ओला एक उपकंपनी किंवा सप्लायर पार्क देखील तयार करेल, जे या परिसरात दुकानदारांना दुकानं उभारण्यास सक्षम करेल, जेणेकरून इतर खरेदीदार देखील थेट खरेदी करू शकतील.

इतर बातम्या

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(OLA will launch 1 lakh electric charging points in 400 cities across India)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.